अहिल्यानगर
अहिल्यानगर महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून आता दोन दिवसानंतर उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

केडगाव येथील प्रभाग क्रमांक सोळा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा,युतीच्या अमोल येवले, विजय पठारे, वर्षा काकडे , सुनीता कांबळे या उमेदवारांसाठी शाहू नगर भागात माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले की केडगावचा शाश्वत विकास करण्यासाठी युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. खासदार असताना केलेल्या कामांची यादी यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी वाचून दाखवली मात्र पराभूत झाल्यानंतरही मी कुठेही काम थांबवले नाही आणि थांबवणार नाही खासदार नसतानाही लाखो कोटींचे कामे आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर शहरात करत आहोत आणि करत राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित मतदारांना दिले. 50 कोटी रुपयांचा निधी नगर शहराच्या नवीन विकसित होत असलेल्या उपनगरांसाठी घेऊन येणारा असून त्या माध्यमातून केडगाव सारख्या भागात रस्ते,बगीचे यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणारा असल्याने जे उमेदवार सध्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार संग्राम यांनी यावेळी सांगितले की केडगाव भागात सिमेंट रस्ते अनेक वर्षानंतर आता पाहायला मिळत आहेत. केडगाव उपनगर बदलत आहे. केडगाव शहरातून जाणारा लिंक रोड नेप्ती मार्केट रोड असे अनेक रोड सिमेंट काँक्रेटने बनवल्यामुळे केडगावची ओळख वेगळ्या प्रकारे निर्माण झाली असून भविष्यकाळात मोठमोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचबरोबर तरुणांसाठी वाचनालय, अभ्यासिका बांधल्या जाणार आहेत. ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत त्यामुळे कोणाच्या नावासाठी आणि अस्तित्वासाठी नव्हे तर केडगावच्या विकासासाठी केडगावकरांनी युतीच्या मतदारांना विजयी करावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शाहूनगर बस स्टँड परिसरात झालेल्या सभेला मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही गर्दी म्हणजेच युतीच्या चारही उमेदवारांची विजयी सभा असल्याचा उल्लेख यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केला.
शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा,मनसे,आणि अपक्ष उमेदवारांनी मोठी रंगत आणली असून चार प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार दिल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील अ भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे उषा नलवडे, शिवसेना शिंदे गटाचे शेळके चंद्रकांत,अपक्ष जयंत येलुलकर यांच्या मध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून निवडणूक चांगलीच घासून होणार आहे.भाजपाचे कमळ,शिवसेनेचा धनुष्यबाण आणि अपक्ष असलेल्या येलुलकर यांची कप बशी ची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.मात्र मतदानाच्या दिवशी होणारे मतदान आणि त्या नंतर येणारा निकालच सांगेल मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार आहे.
तर दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे युवानेते विक्रम राठोड यांनी शिवसेने मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला असून नगर मध्ये झालेल्या शिवसेनेच्या प्रचार सभेत त्यांनी धनुष्य बाणाच्या उमेदवारांना निवडून देण्याची विनंती मतदारांना केली तर दोन दिवसांपूर्वी त्यांनी मशाल विझली म्हणून पोस्ट केली होती.





