Homeक्राईमकीर्ती - विश्वनाथ दुहेरी हत्याकांड प्रकरण आरोपी महेश भेटे सह आई वडील...

कीर्ती – विश्वनाथ दुहेरी हत्याकांड प्रकरण आरोपी महेश भेटे सह आई वडील आणि पोलीस भावावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि.८ ऑक्टोबर :

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्याला निर्दयीपणे लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी नगर शहरातील तपोवन रोड भागातील भिस्तबाग महाल परिसरात घडली होती.

या मारहाणीत किर्ती महेश भेटे ( २२, रा. ढवणवस्ती, नगर) व विश्वनाथ केशव कसबे ( ५४, रा. ढवणवस्ती) या दोघांना जावाई महेश माणिक भेटे (रा. ढवण वस्ती, नगर) याने मारहाण केली होती कीर्ती आणि विश्वनाथ हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीला अहमदनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यामुळे पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र पाच दिवसाच्या जीवनमृत्यूच्या संघर्षात कीर्ती आणि विश्वनाथ या बाप लेकीचा मृत्यू ७ ऑक्टोबर रोजी झाला.

 


यासंदर्भात रेखा विश्वनाथ कसबे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आहे. त्यांची मुलगी कीर्ती
हिचे महेश याच्याशी चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचा आंतरजातीय विवाह असल्याने महेशच्या आई वडिलांनी
त्यांना घरात घेतले नाही. त्यामुळे हे दोघे भाडोत्री घरात राहत होते. महेश याच्यापासून किर्तीला एक मुलगा झाला. दोन वर्षांपासून महेश हा किर्तीला त्रास देत होता. त्यामुळे सासरे विश्वनाथ कसबे यांनी भरोसा सेलमध्ये तक्रार दिली होती. महेश याचा एक भाऊ पोलीस खात्यात आहे. त्याने
भरोसा सेल येथे येऊन तक्रार देऊ नका, मी पोलीस आहे. तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी दिली होती आणि तीन ऑक्टोबर रोजी त्याने आपल्या मुलीला आणि पतीला गंभीर महाराणी केल्याची फिर्याद नोंदवण्यात आली होती शुक्रवारी 7 ऑक्टोबरला कीर्ती आणि तिचे वडील विश्वनाथ या दोघांचाही पाठोपाठ मृत्यू झाला त्यानंतर अहमदनगर शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात महेश भेटे आणि त्याला सहकार्य करणारे व मुलीस वारंवार जाती वरन त्रास देणाऱ्या मंगल भेटे वडील माणिक भेटे आणि आरोपीचा भाऊ मोहन माणिक भेटे याने वेलेवेळी आरोपील
समजावन्या ऐवजी पाठबळ देऊन निघूर्ण कृत्य करण्यास
भाग पाडले. यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना त्वरित अटक करावी. अन्यथाः दोन्हीही मृत्यूदेहांवर अंत्यविधी न करता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मृतदेह आणुन ठेवण्यात येतील असा इशारा दिला होता.

रात्री उशिरा पुण्यावरून कीर्ती आणि विश्वनाथ यांचे मृतदेह नगर मध्ये आल्यानंतर समस्त आंबेडकरी चळवळीतील समाज बांधवांनी महेश याला साथ देणाऱ्या त्याच्या कुटुंबांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला होता कीर्ती आणि विश्वनाथ यांच्या मृतदेह असलेल्या रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच उभा करण्यात आल्या होत्या. सर्व समस्त आंबेडकर ,बांधवांनी थेट तोफखाना पोलीस स्टेशन गाठले त्यामुळे काही काळ तणाव झाला होता. मात्र तोफखाना पोलिसांनी पुन्हा एकदा कीर्तीची आई रेखा कसबे हिचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला त्यानुसार घरगुती हिंसाचार आणि अॅट्रोसिटी अॅक्ट कायद्यानुसार महेश याचे आई-वडील मंगल आणि माणिक भेटे भाऊ मोहन भेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री उशिरा कीर्ती आणि विश्वनाथ तयांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular