अहिल्यानगर दिनांक २२ सप्टेंबर
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी फिर्याद दिली असून त्या मध्ये घटनेची हकीकत सांगितली आहे. दराडे यांचे मेहुणे
नरेंद्र थोरवे यांचे जुहू मुंबई येथे हॉटेल होते. सदर हॉटेल डिसेंबर 2024 पासून बंद केले आहे. माझ्या मेव्हण्याचे हॉटेल असल्याने व मी मुंबई येथे कामानिमीत्ताने जात असताना सदर हॉटेलवर येणे जाणे होते. त्यावेळी तिथे असलेल्या अक्षय नामक व्यक्तीने रिसेप्शनिस्ट पदावर नेमणुकीस असलेल्या महिलेची ओळख करून दिली होती. दराडे यांचा मेव्हणा हा त्याचे इतर व्यवसायामुळे बाहेर देशात राहत असल्याने मुंबई रेस्टॉरंट येथे काही अडचणी आल्यास हॉटेलचा मॅनेजर हा दराडे यांच्या संपर्कात होता. त्याच वेळी तिथे असलेल्या त्या महिलेशी दराडे यांचा कामा निमित्ताने संपर्क सुरू झाला. ती हॉटेलवरील काही अडचणी आल्यास दराडे यांच्याशी संपर्क करून दराडे यांच्या मेव्हण्यास माहीती देण्या करीता संपर्क करु लागली होती.

या नंतर हॉटेल वर जाणे येणे सुरू असताना त्या महिलेने आपली हकीकत सांगून आपण मॉडेल आणि अँक्टर आहोत आणि इंडस्ट्रीमधे मी काम करते आहे माझे खुप काहीतरी करण्याचे स्वप्न आहे परीस्थीतीमुळे मला हा पार्ट टाईम जॉब करावा लागत असल्याचे सांगून भावनिक केले होते.
सदर महिला ऑगस्ट 2023 मधे ती एकदा शुटींग करीता दुबई येथे गेली असता तीने दराडे यांना फोन करुन माझे पैसे संपले आहेत व मला वीस हजाराची गरज असले बाबत कळवले व तुमचे पैसे मी भारतात आल्यानंतर परत देईल तेव्हा दराडे यांनी स्वतःच्या बँकेच्या खात्यातुन ऑनलाईन पध्द्तीने वीस हजार दिले होते. त्यानंतर ती काही ना काही गरजेचे कारण सांगून दराडे यांच्याकडून कधी पाच तर कधी दहा हजाराची मागणी करत राहिली.
डिसेंबर 2024 मधे माझे मेव्हणे नरेंद्र थोरवे यांनी त्यांचे हॉटेल बंद केले. त्यांनी हॉटेल बंद केल्याने त्यांचे हॉटेलमधील सर्वांचीच नोकरी गेली. त्यानंतर सदर महिला दराडे यांच्याशी संपर्क करु लागली. सध्या माझी परीस्थीती हलाकीची आहे. व माझ्याकडे रोजगार सुध्दा नाही. करीता आपण मला काहीतरी मदत करा असे म्हणुन तीने माझ्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा दराडे यांनी पैसे दिले नाहीत ती महिला आपल्याला फसवत असल्याचे लक्षात आल्यानंतर दराडे यांनी तिचे फोन घेेणे बंद केले आणि तिच्याशी संपर्कही बंद केला.
काही दिवसानंतर ती महिला थेट कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आली आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना म्हणाली की,तुम्ही एक तर माझे सोबत लग्न करा नाहीतर मला दोन करोड रुपये दया असे म्हणाली तसेच आपण लगेच आपले सर्व स्टाप समोर माझ्या गळयात हार घालुन लग्न करा नाहीतर मी येथे तमाशा करील अशी धमकी देवु लागली
प्रताप दराडे यांनी या गोष्टीस नकार दिल्यानंतर तिथून बाहेर निघून जाण्यास सांगितले तेव्हा ती महिला दराडे यांना म्हणाली की, तुम्हाला मी एक तास चान्स देते असे म्हणून निघुन गेली व एक तासाने व्हॉटसपवर पुन्हा दराडे यांना पैशाची व्यवस्था झाली का असे मेसेज करत होती तसेच कॉल करत होती.
त्यानंतर त्या महिलेने सलग दोन दिवस दराडे यांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली. 20 सप्टेंबर 2025 रोजी सदर महिला ही पुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन येथे गेली व तिने प्रताप दराडे यांना मेसेज करुन तम्हाला शेवटचा चान्स आहे. त्यानंतर ती एफ आय आर न देता पुन्हा निघुन गेली. त्यानंतर पुढे परत कॉल करुन तुम्हाला शेवटची संधी आहे. तुम्ही मला एक करोड रुपये दिले नाहीतर सोमवारी मी तुमच्या विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहे. तुम्ही असे नका समजु की माझ्या मागे कोणी नाही. मला अहिल्यानगर मधील मोठ मोठया हस्ती मदत करत आहेत. मी तुम्हाला संपवू पण शकते. अशी धमकी देऊन दोन कोटी रुपये मागत होती अखेर दोन कोटी वरून एक कोटी आणि 50 लाखांवर शेवटपर्यंत आकडा आला होता.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी या 30 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष देऊन जवळीक साधली. ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुंबई आणि पालघर येथील फार्महाऊसवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने लग्नाची मागणी करताच दराडे यांनी संबंध विसरून जाण्याचे सांगितले आणि शिवीगाळ करत तिला दमदाटी करायला सुरवात केली. पीडितेने पोलिसांत जाण्याची धमकी दिली असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची आणि उलट तिच्यावर केस करण्याची धमकी दिली असल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे.





