अहमदनगर दि.२७ जानेवारी (नारायण काळे)
: काँग्रेस बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना समर्थन देणारी उघड भूमिका घेणाऱ्या बाळासाहेब साळुंखे यांच्यावर प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाने पक्षातून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर लागलीच जिल्हा काँग्रेस कार्यकारणी देखील बरखास्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेस कार्यकारणी बरखास्त करण्यात आली नसून ती कायम ठेवण्यात आली आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे आम्ही ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभारी पदाचा चार्ज देत असल्याची घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या आयोजित बैठकीत केली आहे.