हातकणंगले दि.१७ ऑगस्ट
कोल्हापूर जिल्ह्यात एक घटना उघडकीस आली असून एका शिक्षकाने आपल्या मोबाईलवर पाकिस्तान झिंदाबाद, असा स्टेटस लावला होता. हातकणंगले पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले असून जावेद अहमद असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर- सांगली मार्गावरील अतिग्रे येथील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो शिक्षक होता.
कोल्हापूर पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत संबंधित शिक्षकावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्या शिक्षकाची आता पोलीस कसून तपासणी करत असून. मूळ जम्मू येथील हा शिक्षक आहे. तो कोल्हापूरपर्यंत कसा पोहोचला या बाबत पोलीस तपासात माहिती समोर येईल.