Homeक्राईमकेडगावच्या कोतकारांची फसवणूक... सीए मर्दासह सुराणावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

केडगावच्या कोतकारांची फसवणूक… सीए मर्दासह सुराणावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

advertisement

अहमदनगर दिनांक 2 ऑक्टोबर
केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून १ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज काढले. ते कर्ज परत न भरता त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सविता भानुदास कोतकर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी कोर्टाच्या आदेशावरून दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर वसंतलालशेटिया, संदीप वालचंद सुराणा, सीए
विजय मर्दा, गणेश दत्तात्रय रासकर,अशोक सहकारी बँकेच्या मार्केटयार्ड शाखेचा शाखाधिकारी अभय निघोजकर, सागर कटारीया असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सविता कोतकर यांच्या नावावर 2015 साली अशोक
बँकेच्या मार्केटयार्ड शाखेतून एक कोटी सत्तर लाख रूपयांचे कर्ज काढले. यातील एक कोटी ५० लाख रूपयांची रक्कम फिर्यादीच्या चालू खात्यावर जमा झाली होती. ही रक्कम झाल्यानंतर वेळोवेळी वरील सर्व आरोप संगमत करून सविता कोतकर यांच्या खात्यात न पैसे वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर करून सर्व पैसे काढून घेत सविता कोतकर यांची फसवणूक केल्याची घटना घडली असून याबाबत सविता कोतकर यांनी कोतवाली पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली होती मात्र तेथे दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी जिल्हा न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करून आपली बाजू मांडल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने आता कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता१८६०नुसार४०६,४०८,४०९,४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत. नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणातील काही आरोपी या प्रकरणातही सामील असल्यामुळे पुन्हा एकदा नगर शहरात खळबळ उडाली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular