Homeक्राईमपुण्यमधून चोरलेल्या रिक्षा नगर मध्ये सापडल्या दोन रिक्षासह चोरटा जेरबंद कोतवाली पोलिसांची...

पुण्यमधून चोरलेल्या रिक्षा नगर मध्ये सापडल्या दोन रिक्षासह चोरटा जेरबंद कोतवाली पोलिसांची कामगिरी

advertisement

अहमदनगर दि.२३ जुलै

पुणे जिल्हयातील भोसरी आणि चिखली येथील चोरीस गेलेल्या ४,५००००/- रु किंच्या चोरीच्या रिक्षा कोतवाली पोलीसांकडुन आरोपीसह जप्त करण्यात करण्यात आल्या आहेत.अहमदनगर शहरातील नालेगाव अमरधाम मागील बाजुस येथे एक इसम दोन चोरीच्या रिक्षाविक्री करणेकरिता घेवुन आलेला आहे. ही माहिती कोतवाली पोलिसांच्या पथकाला कळताच कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ/ शरद गायकवाड, पोना/योगेश भिंगारदिवे, पोकॉ/दिपक रोहकले, पोकॉ/अमोल गाडे, पोकॉ/ सुजय हिवाळे, पोकॉ सोमनाथ राउत,पोकॉ तान्हाजी पवार, पोकॉ/संदीप थोरात, पोकॉ/अभय कदम, पोकॉ/अतुल काजळे,पोहेकॉ/सतीष भांड, पोकॉ/प्रशांत बोरुडे यांनी त्या ठिकाणी जाऊन
सोन्या ऊर्फ सुरज शिवाजी शिंदे वय २८ रा. बुरूडगावरोड अहमदनगर हा दोन रिक्षासह मिळूण आला त्याचेकडे रिक्षाचे कागदत्रविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने आणि त्या रिक्षावर असलेले नंबर खोटे असल्याची खात्री होताच पोलीसांनी सुरज याला ताब्यात घेतले ४,५०,००० /- रुपये किंचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच रिक्षाच्या चेसी नंबर वरून माहिती घेतली असता त्या रिक्षा पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले तसेच या दोन्ही रिक्षा चोरी झाल्याची फिर्याद भोसरी पोलीस स्टेशन येथे आणि चिखली पोलीस स्टेशन यर्थ दाखल झाल्याची माहिती मिळाली

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील सा., अपर पोलीस अधीक्षकसौरभकुमार अग्रवाल
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरुक्षक संपतराव शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular