अहिल्यानगर दिनांक 1 जानेवारी
अहिल्यानगर शहरातील महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून शहराच्या मध्यवर्ती असलेले कोतवाली पोलीस ठाणे समजले जाते.कोतवाली पोलीस ठाण्याचा आवाका मोठा असल्याने या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर नेहमीच मोठा ताण असतो आणि या पोलिस ठाण्याच्या इतिहासात गेल्या काही वर्षांपासून आलेला अधिकारी काही ना काही काही संकटात सापडूनच जातो असा इतिहास झाला आहे.

आता कोतवाली पोलीस ठाण्याचा कामाचा भार इतका मोठा झाला आहे की या ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना तो भार पेलावला जात नाही त्यामुळे या ठिकाणी आता निवृत्त पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्याचा कार्यभार पाहत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.श्रीगोंद्यातील कोळगावचा लाटे सध्या पोलिस स्टेशनचा कारभार पाहत असून त्याच्या इशाऱ्यावर पोलिस ठाणे चालू आहे अशी कुजबुज सुरू आहे . गृहखात्याने अशा कर्तव्यदक्ष निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घेऊन एखाद्या पोलीस स्टेशनचा किंवा कोतवाली पोलीस ठाण्याचा कारभार संपूर्ण त्याच्या हाती सोपवावा अशी चर्चाही आता चांगलीच रंगू लागली आहे.
तर अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून भोसले आखाड्यात एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद नोंदवली आणि गुन्हा दाखल झाला. मात्र पोलिसांनी त्या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले खरे मात्र अटक करण्याची तसदी न घेता सोडून दिले मात्र सोडून देण्या साठी काही अर्थपूर्ण तडजोडी झाल्या का ? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक न करता पोलीस स्टेशनमध्ये आणून पुन्हा सोडून देणे म्हणजे मोठी गंभीर बाब आहे. त्यामुळे मोठेच चांगले रामायण झाले असून त्या प्रकरणातील आरोपींना रात्री पुन्हा उशिरा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती समोर आली असली तरी पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलेल्या आरोपी का सोडले हा प्रश्न अनुत्तरीत आहे.





