अहमदनगर दि.२९ एप्रिल
नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी पार पडली आज या निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया सकाळपासूनच सुरू झाली असून नगर कल्याण रोडवरील अमरजोत मंगल कार्यालय मध्ये ही प्रक्रिया सुरू आहे.
काही वेळापूर्वीच मतपेटी मधील मतपत्रिका कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्यानंतर अनेक ठिकाणी मतपत्रिका कोऱ्या आढळून आल्या असून काही मतपत्रिका बाद झालेल्या आढळून आल्या आहेत तर काही ठिकाणी क्रॉस मतदानही झाल्याचं आढळून आले आहे.
ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून मतदारांचा कौल कोणाकडे आहे यासाठी आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर तालुक्यात अनेक वर्षांपासून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे निवडणुकीचे चित्र असते या निवडणुकीत महाविकास आघाडीचे दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर माजी आमदार माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी अनेक मातब्बर उमेदवार आपल्या पॅनल कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शशिकांत गाडे सर विरुद्ध भाजपचे शिवाजी कर्डिले अशी ही लढाई असून या निवडणुकीत बाळाचा आणि लक्ष्मी दर्शनाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा आरोप महाविकास आघाडी करून करण्यात आला आहे.त्यामुळे आता लक्ष्मी प्रसन्न होणार का मतदारांचा खरा कौल समजणार याकडेच नगर तालुक्याचे लक्ष लागून आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली असून हमाल मापाडी मतदार संघातील पहिला कौल भाजपच्या वतीने आला आहे.