अहमदनगर दि.३० सप्टेंबर –
शारदीय नवरात्री उत्सव निमित्त सारसनगर चिपाडे मळा येथे श्री.रामदेव भक्त मंडळ ट्रस्ट संचलित श्री.रामदेवरा दरबार येथे सकाळी ललिता पंचमी अभिषेक करून कुकुंमार्चना करुन पंडित राजेंद्रजी शर्मा रामवाला यांचे प्रवचन झाले यामध्ये भाविक मंत्रमुग्ध झाले. हे मंदीर राजस्थानचे तीन देवतांचे मंदिर आहे. या ठिकाणी श्री.रामदेवरा दरबार, श्री सचिया माता ओसिया व सालासर हनुमान मंदिर असून. या मंदिराला सकल राजस्थानी समाज व श्री.रामदेवरा भक्त मंडळ ट्रस्टने सर्व सकल राजस्थानी समाज व सर्व समाजाचे सहकार्याने हा दरबार केलेला आहे. श्री रामदेवरा बाबा हे विष्णू अवतार आहेत यांचे राजस्थान मध्ये रामदेवरा पोखरण येते संजीवन समाधी आहे. येथे भाद्रप महिन्यात दहा दिवसाची मोठी यात्रा भरते गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व इतर राज्यातून येथे लाखो भाविक पायी चालत येऊन दर्शन घेतात. तसेच श्री सचिया माता (ओसिया माता) जोधपुर जवळ प्रमुख स्थान आहे. सर्व सकल राजस्थानी समाजाचे श्रद्धास्थान आहे व श्री सालासर बालाजी हनुमान जयपूर जवळ सालासार येथे भव्य मंदिर आहे येथे सर्व समाजातील भक्तमंडळी दर्शनासाठी मोठ्या संख्येने जातात त्यामुळे अहमदनगर शहरात लोक देवताचे मंदिर स्थापित करून दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले आहे.
तसेच या ठिकाणी श्री.रामदेवरा भक्त मंडळ ट्रस्ट येथे सर्वांच्या सहकार्याने भव्य अशी भोजन शाळा व अतिथी भक्तनिवास देखील उभारण्यात येणार आहे. तसेच श्री.रामदेवरा दरबार येथे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच रोज सर्व समाजाचे हजारो भाविक भक्तगण मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.
येथे श्री दुर्गा सप्तशती पाठ व संध्याकाळी भजन कीर्तन माताचा जगराता चालू आहे. येथे नवमी मंगळवारी भव्य नवचडी यज्ञ होणार आहे. व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे व दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात सीमो लंघनाचा सोने लुटण्याचा कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.सर्व नगर शहरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराचे अध्यक्ष बाळूशेठ मालू, उपाध्यक्ष संतोष कटारिया, सचिव सुरेश धामट, कोशाअध्यक्ष ओम मुंदडा आदीसह संचालक व सदस्य सल्लागार मंडळ यांनी केले आहे.