अहिल्यानगर दिनांक ८ ऑगस्ट
नगर शहरा जवळ असणाऱ्या विळद गावातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका मयत झालेल्या महिलेच्या नावावरील जमीन ती मृत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून खरेदी करण्यात आली आहे.

विळद येथील येथील गट नं. १८९/२/२ (जुना गट नं.२००/२/२) मधील काही जमीन रत्नमालाबाई सखाराम ससाणे यांच्या मालकीची होती.रत्नमालाबाई सखाराम ससाणे या दि.०२/०९/१९७७रोजी संभाजीनगर येथील पडेगाव, छावनी याठिकाणी मयत झालेल्या असुन त्यांच्या मागे शामसुंदर सखाराम ससाणे व शशिकांत सखाराम ससाणे तसेच दोन मुली इंदुबाई गेणु आहेर व सिंधुबाई जॉन्सन गवळे या वारसा हक्काने जमिनीच्या मालक होत्या.
मात्र जेव्हा होती.रत्नमालाबाई सखाराम ससाणे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मुलांनी आईच्या नावावरील जमिनीवर वारस हक्क लावण्यासाठी जमिनीचे कागदपत्रे काढले तेव्हा त्यांच्यासमोर धक्कादायक माहिती उघड झाली. त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या ७/१२ उता-यावर त्यावर फेरफार नं. ४५२७ अन्वयेबाळासाहेब अडसूरे , मधुकर शितोळे, प्रकाश धनाजी कापरे यांचे नावे
दिसून आली.
याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयातुन खरेदीखत पाहिले असता रत्नामाला सखाराम ससाणे यांचे जागी दुसरीच महिला उभी करून खरेदी खत केल्याचे रत्नमाला ससाने यांच्या मुला मुलींना समजले. यामध्ये गणी सय्यद सय्यद या माणसाने सही करून सदर अंठ्याचे ठस्याला सही करुन ओळख दिल्याचं खरेदी खातात दिसून आले.
१९७७ मध्ये मय झालेल्या रत्नमाला ससाणे या १९/११/२०१६ मध्ये जिवंत होऊन खरेदी देण्यामागे
यामध्ये खरा मास्टरमाईंड “काळे” नामक इसम असून त्यानेच सर्व कागदपत्रे गनी सय्यद यांच्या मार्फत तयार केल्याची माहिती ससाणे कुटुंबीयांना मिळाली असून. या मध्ये रत्नमालाबाई सखाराम ससाणे यांचे नावाचे बनावट आधार कार्ड, हयातीचा दाखला, वयाचा दाखला, बनवण्यात आले आहेत तसेच रत्नमालाबाई सखाराम ससाणे यांचे नावाने तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर खोटे व बनावट प्रतिज्ञापत्र करुन सदर प्रतिज्ञापत्रावर फक्त अंगठ्याचे ठसे असुन त्यावर कोणतेही दस्तुर नमुद केलेले नाही व अपर जिल्हाअधिकारी, अहमदनगर यांची दिशाभुल करुन बनावट प्रतिज्ञापत्र दाखल करुन बेकायदेशीर खरेदीखत करण्याकरीता परवानगी आदेश एस आर/०१/२०१६ हा अपर जिल्हाअधिकारी, अहमदनगर यांचे पासुन घेऊन खरेदी करतास जोडल्याचे ससाने कुटुंबियांच्या निदर्शनास आले असून याबाबत आता या सर्व गोष्टींचा उलगडा होण्यासाठी अहिल्यानगरच्या खोतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.