अहिल्यानगर दिनांक 10 ऑगस्ट
अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस बेकायदेशीर ताबा मारण्याचे प्रकार वाढत चालले असून. असाच प्रयत्न नगर शहरातील शिवशक्ती स्वॉमील चे मालक डायालाल करसन पटेल यांच्या स्टेशन रस्त्यावरील माळीवाडा बस स्थानक समोर असलेल्या जुने सर्व्हे नं. ३६/बी नगर रचना टीपी स्कीम नं.०३, फायनल प्लॉट ४६ यावर अमित कोठारी, पोपट बोरा व फारुकभाई इतर दहा बारा इसमांनी ताबा मारण्याचा प्रयत्न केला आहे या ताबा मारणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करून आपल्या कुटुंबीयांना संरक्षण द्यावे या मागणी करता डायालाल करसन पटेल यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

अहिल्यानगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील माळीवाडा बस स्थानक समोर जुने सर्व्हे नं. ३६/बी नगर रचना टीपी स्कीम नं.०३, फायनल प्लॉट ४६ अकबर प्रेस या ठिकाणी सथ्था चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या मालकीच्या मिळकतीत गेल्या ६० ते ७० वर्षापासून
डायालाल करसन पटेल हे भाडेकरी असून या ठिकाणी शिवशक्ती स्वॉमील या नावाने त्यांचा व्यवसाय सुरू आहे. तीन ऑगस्ट रोजी अमित रसिकलाल कोठारी, पोपट बोरा, फारुकभाई व हाजी नामक एक व्यक्ती आपल्या इतर दहा-बारा साथीदारांसह डायालाल करसन पटेल यांच्या जागेत अनाधिकृतपणे प्रवेश करून त्या ठिकाणी पत्राचे कंपाउंड मारत होते याबाबत डायालाल करसन पटेल यांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अमित कोठारी यांनी पटेल आणि त्यांच्या मुलाला शिवबा करत या ठिकाणी असलेले सर्व सामान काढून घ्या तुमची मशीन काढून घेऊन जा अन्यथा तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकी देऊन त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या कंपाउंड ची एक भिंत उभी केली.
याबाबत डायालाल करसन पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला असून त्यावर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.
यावर पुन्हा दहा ऑगस्ट रोजी अमित कोठारी यांनी काही माणसे पाठवून डायालाल करसन पटेल यांच्या मालकीच्या स्वॉमील समोर पत्र्याचे कंपाऊड काढून तेथे लोंखंडी दार बसवण्याचा कारनामा केला. रविवारची सुट्टी असल्याने पटेल आपल्या स्वॉमील मध्ये गेले नव्हते तिथे लागलेल्या सीसीटीव्ही च्या माध्यमातून हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर पटेल यांचा मुलगा त्या ठिकाणी गेला होता त्याने तिथे असलेल्या लोकांना दार लावण्यास मनाई केली मात्र तेथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पटेल यांच्या मुलाला शिवीगाळ करून हाकलून लावले.
अमित कोठारी हा गुंड लोकांना घेऊन सातत्याने पटेल कुटुंबीयांना दमदाटी करत असून यामुळे पटेल कुटुंबीय भयभीत झाले आहे. तसेच जागा खाली केली नाही तर पटेल कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करेल अशी धमकी अमित कोठारी सतत देत असून. सध्याची जागा ही सथ्या चॅरेटिबल ट्रस्ट यांनी मिळकतीचा कब्जा मिळण्याकरीता डायालाल करसन पटेल यांच्या
विरोधात नगर कोर्टात सिव्हील दावा नं.९२०/१९९० असा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल दि. २७/०१/१९९९ रोजी न्यायालयाने डायालाल करसन पटेल यांच्या बाजुने दिलेला आहे.
त्यावर ट्रस्ट ने वरीष्ठ न्यायालयाकडे दि.०६/०९/१९९९ रोजी सिव्हील अपील क्र. २८६/१९९९ हे दाखल केलेले होते. ते अपील सुध्दा न्यायालयाने दि. १७ जानेवारी २०१२ रोजी फेटाळलेला असल्याचे डायालाल करसन पटेल यांच्याकडे पुरावा आहे.
या जागेत डायालाल करसन पटेल यांच्या स्वतःच्या मालकीचे अनेक वर्षांपासून स्वॉमील असून स्वॉमील साठीचा कायदेशीर वन विभागाचा परवाना आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनी आणि महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या पटेल यांच्या नावाने असून अनेक वर्षांपासून रीतसर पणे काम सुरू असताना अमित कोठारी, पोपट बोरा, फारुकभाई यांनी पटेल यांची जमीन बळकावण्याचा डाव आखला असून या सर्व लोकांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी डायालाल करसन पटेल यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या लोकांवर गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.