अहिल्यानगर दिनांक 12 ऑगस्ट
३८ वर्षानंतर मयत झालेली महिला जिवंत होऊन तिने आपल्या जागेचे खरेदी करत करून दिले हा प्रकार नगर शहरात घडला असून विळद येथील येथील
होती.रत्नमालाबाई सखाराम ससाणे यांनी २०१६ मध्ये पुन्हा जिवंत होऊन बाळासाहेब भागवत अडसूरे ,मधुकर रघुनाच शितोळे, प्रकाश धनाजी कापरे यांना आपली जमीन विकली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विळद येथील येथील गट नं. १८९/२/२ (जुना गट नं.२००/२/२) मधील काही जमीन रत्नमालाबाई सखाराम ससाणे यांच्या मालकीची होती.रत्नमालाबाई सखाराम ससाणे या दि.०२/०९/१९७७रोजी संभाजीनगर येथील पडेगाव, छावनी याठिकाणी मयत झालेल्या असुन त्यांच्या मागे शामसुंदर सखाराम ससाणे व शशिकांत सखाराम ससाणे तसेच दोन मुली इंदुबाई गेणु आहेर व सिंधुबाई जॉन्सन गवळे या वारसा हक्काने जमिनीच्या मालक होत्या. मात्र. यांना नकळत १९/११/२०१६ मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट महिला उभी करून खरेदी झाल्याचा प्रकार घडला आहे.
बनावट कागदपत्रे आणि आधार कार्ड बनवण्यामागे
खरा मास्टरमाईंड “काळे” नामक इसम असून त्यानेच सर्व कागदपत्रे “गनी सय्यद” यांच्या मार्फत तयार केल्याची माहिती ससाणे कुटुंबीयांना मिळाली असून. या मध्ये रत्नमालाबाई सखाराम ससाणे यांचे नावाचे बनावट आधार कार्ड, हयातीचा दाखला, वयाचा दाखला, बनवण्यात आले आहेत.
तर थेट रत्नमालाबाई सखाराम ससाणे यांचे नावाने तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर खोटे व बनावट प्रतिज्ञापत्र करुन सदर करण्यात आले आहे.म्हणजे फक्त दुय्यम उपनिबंधक कार्यालय नव्हे तर जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार यांनाही खोटे कागदपत्र सादर करण्यात आले आहेत.
बाळासाहेब भागवत अडसूरे, मधुकर रघुनाथ शितोळे प्रकाश धनाजी कापरे व इतर इसम यांनी शासनाची देखील फसवणुक करून जमीन बळकावणाऱ्या लोकांवर कारवाई करावी या करिता यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम ३१८ (४),३१९ (२), ३३६(२), ३३६ (३),३३७,३३८,३३९,३४०(१), ३४० (२),२३८, व ३४ प्रमाणे तसेच कलम २३६,२३७ प्रमाणे खोटे प्रतिज्ञापत्र व खरेदीखत केल्यामुळे सदर आरोपीवर गुन्हा दाखल करुन सदर सर्व आरोपीना लवकरात लवकर अटक करुन कडक शासन करुन सदर इसमां विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात यावी याकरिता
शामसुंदर सखाराम ससाणे यांच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.





