HomeUncategorizedआता घर बसल्या पाहता येणार जमिनीचे रेडीरेकनर'चे दर एका क्लिक वर

आता घर बसल्या पाहता येणार जमिनीचे रेडीरेकनर’चे दर एका क्लिक वर

advertisement

पुणे – दि.२१ डिसेंबर

राज्याच्या नकाशावरील कोणत्याही शहर अथवा गावांवर ‘क्लिक’ करताच त्या त्या भागातील सरकारी, खासगी जमिनींचे ‘रेडीरेकनर’चे दर सहज कळणार आहेत. त्यासाठी नोंदणी मुद्रांक व शुल्क विभागाने ‘जीओ पोर्टल’ विकसित केले आहे. आतापर्यंत राज्यात पुण्यासह २२ जिल्हे, ४०० महानगरपालिका, नगर परिषद भागातील रेडीरेकनर ‘अपलोड’ करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जानेवारीपासून ही सुविधा सुरू होणार आहे. परिणामी, नागरिकांना घरबसल्या एका ‘क्लिक’वर विविध शहरांतील विविध भागातील जमिनींचे रेडीरेकनर कळणार आहेत.

यासाठी ‘एमआरसॅक’ची मदत घेऊन त्यांच्यामार्फत हे काम सध्या करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील शहर महापालिका असलेल्या २२ जिल्ह्यांचे रेडीरेकनर अपलोड करण्याचे काम झाले आहे. उर्वरीत १३ जिल्ह्यांची माहिती अपडेट करण्याचे काम बाकी आहे. पुढील वर्षात हे काम पूर्ण होऊ शकते, असे नोंदणी मुद्रांक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रत्येक गावांसह शहरातील जमीन, घरे, इमारतीतील सदनिका यांसारख्या मालमत्तांचे रेडीरेकनर जाणून घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तेथे जाऊन छापील अर्ज भरण्यासोबत संबंधित भागाचे प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा द्यावा लागतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याच्या सोयीनुसार रेडीरेकनरचा दर काढून दिला जातो. गरज पडल्यास चिरीमिरीही द्यावी लागते; हेलपाटे मारावे लागतात. हेलपाटे मारणे बंद होणार आहे; तसेच नोंदणी मुद्रांक विभागाच्या वेबसाइटवर जाऊन तपासावे लागते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular