Homeविशेषमहावीर ग्रुपच्या वतीने भिस्तबाग चौक येथे क्राऊन प्लाझा मॉर्डन मार्केटचा शुभारंभ ...

महावीर ग्रुपच्या वतीने भिस्तबाग चौक येथे क्राऊन प्लाझा मॉर्डन मार्केटचा शुभारंभ क्राऊन प्लाझा मार्केटच्या माध्यमातून रोजगार निर्मिती – आ. संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि.९ नोव्हेंबर –

शहराचा अनेक वर्षाचा रखडलेल्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचे काम सुरू आहे. आपल्याला मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे करावी लागत आहेत सकारात्मक दृष्टिकोनातून विकासाचे नियोजन करून कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागली जात असल्यामुळे बांधकाम व्यावसायिक,उद्योजक नामांकित कंपन्यांचे ब्रँड नगरमध्ये दाखल होत आहे. नगर आता विकास कामातून बदलत आहे महावीर ग्रुपने भिस्तबाग चौक येथे क्राऊन प्लाझा मॉर्डन मार्केट सुरू करण्याचा संकल्प केला असल्यामुळे नगर शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल या माध्यमातून शहरातील नागरिकांना रोजगार निर्मिती होणार आहे. विकासाला चालना दिल्यामुळेच शहर आता बदलू लागले आहे.

काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी नकारात्मक चर्चा करत असतात मात्र नगरकर आता सुरू असलेल्या विकास कामांकडे लक्ष देत आहेत आपल्या सर्वांना मिळून नगर शहराला एक वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. शहराची ओळख माणसांबरोबर व वास्तुमुळे घडत असते शहराला एक पाचशे वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. या इतिहासाचे जतन करून स्वच्छ सुंदर व हरित शहर बनवायचे आहे मुंबई-पुणे येथे सुरू असलेल्या नामांकित कंपन्यांचे ब्रँड आता नगरमध्येही दाखल होत आहे पूर्वी शहरामध्ये व्यवसायाला पोषक असे वातावरण नव्हते आता ते मिळाले असल्यामुळेच व्यावसायिक नगर शहराकडे आकर्षित झाले आहेत.महावीर ग्रुपने शहरामध्ये क्राऊन प्लाझा मॉर्डन मार्केट चे काम सुरू केल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

पाईपलाईन रोड भिस्तबाग चौक येथे महावीर ग्रुपच्या वतीने क्राऊन प्लाझा मॉर्डन मार्केट च्या कामाचा शुभारंभ .आ.अरुणकाका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,आ.संग्राम जगताप, आयुक्त डॉ.पंकज जावळे, महावीर ग्रुपचे संचालक राजेश भंडारी,अभिनेत्री श्रुती मराठे, उद्योजक मोहन मानधना, संतोष भंडारी,गणेश गोंडाळ,मयूर शेट्टीया,मा. महापौर बाबासाहेब वाकळे, मा.उपमहापौर अनिल बोरुडे, स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, डॉ.विजया भंडारी,नयना भंडारी,नगरसेवक डॉ.सागर बोरुडे,नगरसेवक बाळासाहेब पवार,आशिष पोखरणा, निखिल वारे,अमोल गाडे,विनीत पाऊलबुद्धे, रवींद्र बारस्कर, शिवाजी कराळे,उदय कराळे आदिंसह सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले की, दोन वर्षाच्या कोरोना काळाच्या संकट काळानंतर आता जनजीवन सुरळीत झाले आहे आपण सर्वांनी या काळामध्ये जिल्हा प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे कोविड वर मात केली आहे. नगर शहर स्मार्ट सिटी व्हावी यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत आ. संग्राम जगताप यांचे कोविड काळामध्ये चांगले सहकार्य लाभले महावीर ग्रुपच्या वतीने नगर शहरात क्राऊन प्लाझा च्या माध्यमातून मॉर्डन मार्केट निर्माण होत आहे. असेच मोठे प्रकल्प नगर शहरांमध्ये येऊन वैभव वात भर घालतील शहराच्या विकासामध्ये आमचे नेहमीच सहकार्य राहील महावीर ग्रुपचे संचालक राजेश भंडारी यांनी सुरू केलेला प्रकल्प कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले की, शहर विकासाच्या प्रकल्पाला गती देण्याचे काम सुरू आहे शहरातील विविध रस्त्यांची कामे मंजूर असून ती आता लवकर सुरू होतील स्मार्ट सिटी साठी आम्ही सर्वजण मिळून काम करू पुढील वीस वर्षाचा विचार करून आत्ताच पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील नगरच्या सौंदर्यात महावीर ग्रुपचा वाटा राहील असे ते म्हणाले.

महावीर ग्रुपचे संचालक राजेश भंडारी म्हणाले की, व्यवसाय करीत असताना आपण शहराच्या सौंदर्यकरणात भर पडावी या दृष्टिकोनातून भिस्तबाग चौक येथे महावीर ग्रुपच्या वतीने क्राऊन प्लाझा मॉर्डन मार्केट ची निर्मिती सुरू केले आहे या माध्यमातून शहराच्या अर्थ करण्याला बळ मिळेल मा. आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांचे शहर विकासासाठी नेहमीच सहकार्य लाभत असते या माध्यमातून शहरातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.
यावेळी महावीर ग्रुपच्या वतीने साकरण्यात येत असलेल्या क्राऊन प्लाझा मॉर्डन मार्केटच्या शुभारंभ प्रसंगी सांस्कृतिक संगीत,गायन व नृत्य याचे दिव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांनी लाभ घेऊन उपस्थिती लावली.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular