अहिल्यानगर दिनांक २४ डिसेंबर
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वसंत गांगर्डे, वय 54 वर्ष यांचा वीस डिसेंबर रोजी रात्री अपघात झाला होता, अपघातामध्ये त्यांच्या तोंडाला आणि डोक्याला मार लागल्याने त्यांना प्रथम साईदीप हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.त्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करण्यासाठी रुबी हॉल पुणे येथे पाठविण्यात आले होते. रुबी हॉल पुणे येथे औषध उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले आहे.

त्यांचा अंत्यविधी त्यांची मूळ गाव कुंभळी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे