Homeक्राईमपोलिसांनी वेषांतर करून खंडणी आणि अपहरणातील तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या...

पोलिसांनी वेषांतर करून खंडणी आणि अपहरणातील तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

advertisement

अहमदनगर दि.११-

पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय २७, रा. उंबरे, ता. राहुरी), सुधीर संपत मोकळ (वय २३,रा. पारगांव खुर्द, ता. कोपरगाव), संदीप उर्फ बंडू रंगनाथ कोरडे (वय ३२ रा. घोगरगांव, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार,भीमराज खर्से, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, रणजीत जाधव, बबन बेरड आदींच्या पथकाने राहुरीत जाऊन वेशांतर करून सापळा रचून किरण दुशिंग यास जेरबंद केले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार सुधीर मोकळ, सदीप कोरडे यांची नावे सांगितली. गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश नगर (ता. संगमनेर ) येथे जाऊन मोकळ यास ताब्यात घेतले तर संदीप कोरडे यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. किरण दुशिंग याच्याकडे कारबाबत विचारणा केली असतात्याने सदरची गाडी ही मध्यप्रदेश राज्यातून चोरी
केल्याचे सांगितले.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular