Home विशेष यशोगाथा : “स्त्री” भरारीची, लढाई तिच्या अस्तित्वाची… आव्हानात्मक व्यवसाय निवडून ती घेतेय...

यशोगाथा : “स्त्री” भरारीची, लढाई तिच्या अस्तित्वाची… आव्हानात्मक व्यवसाय निवडून ती घेतेय यशस्वी भरारी..

अहिल्यानगर
8 मार्चला संपूर्ण ‘जगभरात महिला दिन’ साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी महिलांचं प्रमाण जवळपास निम्मं आहे. महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे, पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकीच संधी आणि सन्मान मिळत नाही. आजही त्यांना समानतेच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी झगडावं लागलं, लढावं लागतं.

Oplus_0

अहिल्यानगरच्या रेवती धापटकर यांचे शिक्षण बी.ई. कॉम्प्युटर असून वेगळे काही तरी करण्याच्या जिद्दीतून रेवती या वेगळ्याच क्षेत्रात भरारी घेत असून अहिल्यानगर मध्ये दिग्विजय इंटरप्राईजेस या कंपनीच्या माध्यमातून पार्किंग मॅनेजमेंट द्वारे विविध ठिकाणी पे अँड पार्कचा ठेका घेऊन तो ठेका गरजू महिलांच्या माध्यमातून चालवत यशस्वी घौडदौड सुरू आहे. आपले मूळ शिक्षण आणि या व्यवसायात खूप मोठा फरक होता मात्र एक आव्हान म्हणून रेवती यांनी हा व्यवसाय करायचा ठरवलं आणि त्यात त्या दोघी यशस्वी ठरत आहेत. तर त्यांच्या बरोबर प्रकल्प समन्वयक म्हणून अमृता जाधव या काम पाहत असून त्या फार्मसिस्ट आहेत.
आपल्याबरोबर आणखी गरजू महिलांनाही या क्षेत्रात घेऊन त्यांनी महिलाही कुठे कमी नाहीत हे दाखवून दिलं आहे

पे अँड पार्क अथवा नो पार्किंग कामाचा ठेका घेऊन महिलांनी चालवणे म्हणजे मोठे जिकरीचे काम आहे.पावलोपावली नागरिकांना नियमांची आठवण करून देत नियम न पाळणाऱ्या नागरिकांना शिस्त लावणे हे मोठे काम असते मात्र रेवती धापटकर यांनी सोळा महिलांच्या माध्यमातून हे काम नगर शहरात सुरू केल आहे. या कामासाठी
रेवती धापटकर आणि यांनी गरजू महिलांचा शोध घेतला तसेच या महिलांना प्रशिक्षण दिले आणि त्यांना उदरनिर्वाहाचे एक साधन म्हणून या सेवेत सामावून घेतले आहे. ज्या महिला घरी बसून होत्या त्याच महिला आता या कामाच्या माध्यमातून दोन पैसे कमवू लागल्यामुळे घर खर्च भागू लागला आहे. तर या महिला काम करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झालेला आहे. सोळा महिलांसह दहा पुरुष या कामासाठी रेवती धापटकर आणि यांनी कामगार म्हणून घेतल्या आहेत त्यांना समजता मान सन्मान मिळवून दिला आहे. प्रत्येक कामगाराकडे आपल्या घरातील व्यक्ती असल्यासारखं लक्ष रेवती धापटकर घालत असतात. गरजू महिलांना कुठेतरी काम मिळावे यासाठी त्यांनी महिलांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे हे एक चांगले पाऊल महिला म्हणून
रेवती धापटकर यांनी टाकले आहे.

अनेक गरजू महिलांना या ठिकाणी काम मिळाल्यामुळे रेवती धापटकर आणि अमृता जाधव यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी देऊन त्यांची सामाजिक आणि आर्थिक ताकद दिली आहे.तसेच कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी विशेष लक्ष दिले जाते. अहिल्यानगर शहर हे आपले शहर असून या शहराची ओळख शिस्तीचे शहर म्हणून व्हावी यासाठी रेवती धापटकर सध्या कष्ट घेत असून रोज नवीन सुरुवात म्हणून त्या काम करत आहेत.आज नाहीतर भविष्यकाळात निश्चितच शहर बदललेलं दिसेल असा विश्वास रेवती धापटकर यांनी व्यक्त केला आहे. काम करताना अनेक अडचणी येतात मात्र सर्व अडचणींवर यशस्वी मात करून अडचण हीच संधी म्हणून रेवती धापटकर आपल्या टीम सह हळूहळू यशाकडे मार्गस्थ होत आहेत.

महिला दिन हा दिवस केवळ शुभेच्छांचा नसून, महिलांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा आणि त्याद्वारे समाजप्रबोधनाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे त्यामुळे संसाराचा गाडा पुढे घेऊन जात असताना आपल्याबरोबर आणखी काही गरजू महिलांचे संसार ओढण्याचा प्रयत्न रेवती धापटकर करत आहेत त्यांच्या कार्यास मनापासून सलाम.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version