Homeशहरअंजुमने तरक्की उर्दु हायस्कूलच्या चांद सुलताना हायस्कुलच्या धर्मदाय आयुक्त यांनी घोषित केलेल्या...

अंजुमने तरक्की उर्दु हायस्कूलच्या चांद सुलताना हायस्कुलच्या धर्मदाय आयुक्त यांनी घोषित केलेल्या नवीन विश्वस्तांच्या हाती कारभार देण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नवीन विश्वस्तांचे पत्र.

advertisement

अहमदनगर दि.१३ ऑक्टोबर-

नगर शहारतील अंजुमने तरक्की उर्दु च्या चाँद सुलताना हायस्कुलच्या विश्वस्त पदाचा तसेच नवीन चेअरमन व्हॉइस चेअरमन पदाचा वाद सध्या चांगलाच रंगला असून दोन दिवसांपूर्वी धर्मदाय उपायुक्त कार्यालयाकडून चेंज रिपोर्ट मंजूर होऊन या संस्थेच्या नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली होती. मागील जुन्या विश्वासाने नव्याने काही विश्वस्त बदलून घेऊन अचानकपणे नवीन विश्वस्तांची निवड जाहीर केली होती हा वाद आता चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.

धर्मदाय आयुक्त्यांकडून चेंज रिपोर्ट मंजूर झालेल्या विश्वस्तांनी चेअरमन म्हणून सय्यद मतीन अ. रहिम यांची निवड केली आहे. बुधवारी सकाळी त्यांनी चाँद सुलतान हायस्कूलच्या मुख्याध्यापक आणि चाँद सुलताना हायस्कूल व ज्यु-कॉलेजचे प्राचार्य यांना पत्र देऊन धर्मदाय आयुक्त यांच्या मंजुरीने नवीन विश्वस्त मंडळ तयार झाले असून या विश्वस्त मंडळाला विश्वासात न घेता इथून पुढचे कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये चेअरमन यांचे सहयाचे नमुणे घेऊन बँक खात्यात सहयांचे बदल करून द्यावे. सर्व कर्मचा-यांना नवीन संचालक मंडळाची माहिती देण्यात यावी तसेच या संस्थेत असलेली यापुर्वीची बेकादेशीर कामकाज करणाऱ्या व्यक्तीचे सामान घेऊन जाण्यासाठी संबंधितांना कळविणे व संस्थेच्या मालमत्ते व आवश्यक कागदपत्रे, इतिवृत्त, ऑडीट रिपोर्ट आदी नवीन विश्वस्तांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच इथून पुढे कोणत्याही व्यवक्तीस पत्रव्यवहार व कागदपत्रे देऊ नये यापुर्वी असलेल्या बेकायदेशीर कामकाज पाहणाऱ्या मंडळींना आपण त्यांचे स्वतःचे वैयक्तिक काही साहित्य,
कागदपत्रे असल्यास ते १ दिवसात घेऊन जाण्यास सांगावे. अशा प्रकारचे पत्र संस्थेत नूतन चेअरमन यांच्या हस्ते लावण्यात आले व हायस्कुल आणि कॉलेजच्या प्रमुखांना देण्यात आले असून या पत्रावर ताबडतोब कार्यवाही करावी अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

नवीन विश्वस्तांनी संस्थेचा कारभार हाती घेण्यासाठी या आधीच पोलिसांना पत्र देऊन संरक्षण देण्याची मागणी केली आहे. येत्या 2 दिवसात नवीन विश्वस्त मंडळ या संस्थेचा कारभार हाती घेण्याची शक्यता असून रीतसर पत्र देऊन त्यांनी याबाबत संस्थेतील कर्मचाऱ्यांना तसे कळवले आहे. त्यामुळे आता जुने विश्वस्त मंडळ याबाबत काय भूमिका घेतात याकडेच सभासदांचे लक्ष लागले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular