जामखेड दि२४ एप्रिल
वाढत्या भारनियमनामुळे ग्रामीण भागात ग्रामस्थांचा जगणं मुश्कील झालं आहे दिवसभर कडक ऊन आणि त्यामुळे बसणाऱ्या झळा आणि रात्री भारनियमनामुळे गेलेली लाईट यामुळे ग्रामीण भागात नागरिकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे.
काही घरात इन्व्हर्टर आहेत मात्र ते चार्ज होईल तेवढी सुद्धा लाईट मिळत नसल्याने त्या इन्व्हर्टर चा उपयोग फक्त शोभे पुरता झाला आहे. या अनियमित भारनियमनाच्या विरोधात भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंदील मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
खर्डा चौक ते बीड रोड पर्यंत कंदील मोर्चा निघणार असून भारनियमन बंद करण्यात यावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा द्यावा तसेच उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी वीज नसल्याने हातातोंडाशी आलेली पीक वया जतील अशी भीती असल्याने भारनियमना विरोधातील मोर्चात सर्वांनी सामील व्हावे असे आव्हान भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.