अहिल्यानगर दिनांक ८ ऑगस्ट
अहिल्यानगर शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या हॉटेल मधील वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला असून. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय विदयुत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे वीज चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वीज मीटरमध्ये फेरफार करुन मागील १२ महिन्यापासुन ५२७९ युनिटची वीज चोरी केली असल्याची तक्रार छत्रपती संभाजी नगर येथील अतिरीक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र हिरालाल राजपुत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून ग्राहक क्रमांक नंबर १६२०१०७१२४९१ यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १,२३, १८८ रुपयांची ५२७९ युनिटची विज चोरी उघड झाली आहे. या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनच्या मपोना वर्षा पंडित करीत आहेत.