अहमदनगर दि.९ एप्रिल
अहमदनगर शहरात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने तुफान वारा आणि गारांसह जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक मोठमोठे झाडे उन्मळून पडली आहेत. आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक विजेचे खांबही कोसळलेआहेत. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा अनेक ठिकाणी खंडित झालाय. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वीज वितरण कार्यालयाकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम वेळेत न झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांनी वीज वितरण कंपनी वर आपला रोष व्यक्त केला आहे.
एका सावेडी विभागचे उदाहरण घ्यायचं ठरल्यास लाखो लोकांमागे या सावेडी वीज वितरण कार्यालयात फक्त 17 कर्मचारी असून यामध्ये पाच कर्मचारी कंत्राटी कामगार म्हणून भरती झालेले आहेत. त्यापैकी तीन जण विविध कारणांमुळे गैरहजर असल्यामुळे 14 कर्मचाऱ्यांच्या जीवावर एक अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून अहोरात्र जागून वीज सुरळीत करण्याचं काम करत आहे. मात्र विविध ठिकाणी कोसळलेले झाड यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा आणत आहेत. कमी कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा वीज सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागरिक संताप व्यक्त करताना कर्मचाऱ्यांना काम करू देत नाहीत. प्रत्येक नागरिकाला असे वाटते की कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्याने माझा फोन उचलला पाहिजे मक्तर जर तो अधिकारी किंवा कर्मचारी प्रत्येकाचे फोन उचलत बसला तर लाखो लोकांचे फोन एकाच वेळी या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जात असतात त्यामुळे सतत फोन बिझी येत असतो आणि नागरिकांचा संताप तिकडे वाढत असतो.
24 तासापेक्षा जास्त वेळ लाईट न आल्याने रविवारी रात्री काही नागरिकांनी झोपडी कॅन्टीन समोर नगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको हे केला मात्र रस्ता रोको करूनही काही उपयोग होतोय का कारण शेवटी कर्मचारी हा माणूसच आहे गेल्या तीन दिवसांपासून अत्यंत जोखमीचे काम तो करत असताना त्याला निसर्ग साथ देत नाही तसेच अचानक पाऊस सुरू झाल्याने विजेचे काम बंद करावे लागते त्यामुळे काम अर्धवट राहते हे लक्षात न घेता नागरिक वीज वितरण कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करतात हे योग्य नाही. त्यामध्येच काही राजकीय पुढारी आणि राजकीय कार्यकर्ते कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सतत फोन करून लाईट कधी येणार याची विचारणा करत असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळली जाते तर काही राजकीय पक्ष वीज वितरण कंपनी विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात मात्र फक्त एक तार जोडण्यासाठी खांबावर चढून ते काम एखाद्या कार्यकर्त्यांनी करून दाखवावे आणि मगच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त करावा अशी भावना आता कर्मचारी बोलू लागले आहेत.
48 तासांपासून कर्मचारी सतत ड्युटीवर आहेत ना झोप ना जेवण मात्र तरीही कर्मचाऱ्यांविरुद्ध होणारा संताप हा चुकीचा असल्याचा काही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवला आहे त्यामुळे लाईट सुरळीत होईल मात्र थोडा संयम धरावा असे आवाहन वीज वितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
Ho . Ahena Manus pan ajun Mahavitaran develop kadhi honar ? Mahavitaranat khup corruption ahe . Khup lazy and corrupt ahe . Ajun te budtach dakhwtat mg itkya varsha pasun he buditach chaley kama na karta yana fakta monthly payment hawe..TAX increase karun customers la chutiyat kadht ahet , ikde rate pan vadhwayche and TAX pan Ani natar sangayche Mahavitaran totyat chalaly kama nako fakta monthly payment dya …