अहमदनगर दि.२९ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील शहर सहकारी बँके पासून( ahmednager shahar sahkari bank) सुरू झालेल्या बनावट सोनेतारण कर्ज (fake gold mortgage) प्रकरणाची लिंक आता अहमदनगर जिल्ह्यात नावजलेल्या श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट ऑप सोसायटी(Shree Sant Nagebaba Multistate Op Society ) पर्यंत गेली आहे. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेल्या सचिन जाधव याच्याकडून अनेक प्रकरण उघड होत असून श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट को ऑप सोसायटी मध्ये बुधवारी पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये१९ जणांच्या ४४ संशयित खात्यामधून तब्बल 3,0 21.55 (तीन हजार एकवीस ग्रॅम पंचावन्न मिलीग्राम ) बनावट सोने मिळून आले याची किंमत रक्कम 1,02,84,800 (एक कोटी दोन लाख ८४ हजार ८००) इतकी असून अनेक सर्वसामान्य लोकांच्या नावावर ही सोनेतारण कर्ज प्रकरणे केली गेली आहेत.
पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून अजूनही मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.दिवसेंदिवस सोने तारण घोटाळ्याची व्याप्ती वाढताना दिसून येत आहे. श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीची अजूनही काही संशयित खाते तपासणी करण्याचे राहिले असल्याने अजूनही या सोसायटीच्या माध्यमातून किती कोटी कर्ज प्रकरणी केली गेली आहेत ते तपासातून बाहेर येईल.