Homeक्राईमअहमदनगर शहरात गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या आरोपीला स्थानिक...

अहमदनगर शहरात गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद चार गावठी कट्टे आणि सोळा जिवंत काडतुसे हस्तगत

advertisement

अहमदनगर दि२ सप्टेंबर

अहमदनगर शहरात विक्री करण्यासाठी चार गावठी कट्टे व सोळा जिवंत काडतुस बेकायदशिररित्या स्वतः तयार करून विक्री साठी नगर शहरात आला असताना आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या(  Local crime branch )पथकाने आरोपी जेरबंद (arrested )केल आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके, यांना गणेशोत्सव (ganesh festival)अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एक इसम गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी(live cartridges for sale in Ahmednagar city.) अहमदनगर येथे तारकपुर एसटी स्टॅण्ड(bus stand) परिसरात येणार आहे.त्या माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई / सोपान गोरे, सफौ / राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ देवेंद्र शेलार, पोना/विशाल दळवी, शंकर चौधरी, पोकॉ/ शिवाजी ढाकणे, आकाश काळे, मपोना/भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे अशांनी मिळून तारकपूर परिसरात सापळा लावून रितेंद्र सिंह बरनाला (वय २२, रा. उमरती, जिल्हा बडवानी, राज्य मध्य प्रदेश हल्ली रा. धुलकोट, ता. भगवानपुरा, जिल्हा खरगोन, राज्य मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चार (०४) गावठी बनावटी कट्टे, सोळा (१६) जिवंत काडतूसे असा एकूण १,३१,२००/- रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.

गावठी कट्टे आणि काडतुसे हे त्याने स्वतः आपल्या मुळगांवी तयार करुन विक्री करण्यासाठी आणलेले आहेत अशी कबुली दिली.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सफौ / राजेंद्र देवमन वाघ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular