अहिल्यानगर दिनांक १३ नोव्हेंबर
गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले होते की भाजप उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली, मात्र आता त्यांचं नाव घेणे योग्य ठरणार नाही असं म्हणत त्यांनी गौप्यस्फोट देखील केला होता. हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे. भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले होते.
त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला भाजपातून छुपी मदत करत आहे का हा प्रश्न उपस्थित राहतोय त्यावेळी निलेश संकेत खासदार नव्हते मात्र आता निलेश लंके हे खासदार झाले असून त्यांची मोठी ताकद अहिल्यानगर जिल्ह्यात तयार झाली आहे. त्यामुळे लोकसभेत केलेली मदत पुन्हा आता विधानसभेतही मदत करणार का असा सवाल उपस्थित राहतोय. मात्र निलेश लंके यांच्या तेव्हाच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या बाबत संभ्रम निर्माण झाला होता ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खरंच पक्षाचे काम निष्ठेने केले होते त्यांच्यावरही संशय निर्माण झाला होता. मात्र बोटावर मोजण्या इतक्या फुटीरवादी कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण पक्षाला बदनामी सहन करायला लागते हे मात्र खरे आहे.