अहिल्यानगर दिनांक ८ जानेवारी
अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 67 व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दिनांक 29 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2025 दरम्यान वाडियापार्क मैदान, अहिल्यानगर येथे होणार आहे अशी माहिती
अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेल्या 36 जिल्हे, 6 महानगरपालिका असे एकुण 42 संघ सहभागी होत आहेत, या स्पर्धेत एकूण 840 कुस्तीगीर सहभागी होत असून स्पर्धे दरम्यान 850 ते 900 कुस्त्या होतील. ह्या स्पर्धेत 100 पंच व 80 पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडणार आहेत.
स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफीक शेख, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे, शुभम शिंदनाळ, सुदर्शन कोतकर, माऊली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री
देवेन्द्रजी फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे , अजित पवार , केंद्रीय राज्य मंत्री पै. मुरलीधर मोहोळ, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मा. खा. रामदासजी तडस उपस्थित राहणार आहेत.
नगर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदिप (आप्पा) भोंडवे व सरचिटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके अहमदनगर (अहिल्यानगर) कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम जगताप साहेब, उपाध्यक्ष पै. अर्जुन (देवा) शेळके, महाराष्ट्र केसरी पै. अशोक भाऊ शिर्के, महाराष्ट्र केसरी पै. . गुलाब बर्डे, सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ, सह सचिव पै. प्रविण घुले सर्व पदाधिकारी व शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थित होते.