मुंबई दि.१ सप्टेंबर
DG लोन खात्यासाठी जेवढा निधी आवश्यक होता, तो निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस{(devendra fadnavis) यांनी दिली. यानुसार आता पोलिसांना 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज(loan) खात्यांतर्गतच मिळणार आहे. यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांना 15 लाखात घरं(home) देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ही कर्ज सुविधा सुरु केल्याने, पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारकडून गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाला याबाबतची माहिती दिली. यापूर्वी ठाकरे सरकारने DG लोन (DG loan) ही सुविधा बंद केली होती. ती आता फडणवीसांनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलला आहे.