शिर्डी दि.२० ऑगस्ट
महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब एटीएस च्या पोलिसांनी शिर्डी मधून राजींदर नावाच्या एका आरोपीला अटक केली असून हा आरोपी दहशतवादी असल्याची माहिती समोर येत आहे. पंजाब मधील एका पोलीस उपनिरीक्षकाला मारण्याचा कट या राजींदर याने केला असल्याची माहिती समोर येत असून. याबाबत पंजाब एटीएस आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत शिर्डी मधून राजेंद्र याला ताब्यात घेतले आहे. पंजाब एटीएस पुढील तपासासाठी त्याला पंजाब मध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती ही समोर येत आहे याबाबत स्थानिक पोलिसांना उशिरा याबाबतची माहिती मिळाली असून शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये सध्या राजिंदर गेला ठेवण्यात आले आहे.