Home Uncategorized मुंबईसह पुणे अहमदनगर जिल्ह्यात वॉन्टेड असलेल्या सुपारी किलरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या...

मुंबईसह पुणे अहमदनगर जिल्ह्यात वॉन्टेड असलेल्या सुपारी किलरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

अहमदनगर दि.१८ एप्रिल
मुंबई,पुणे जिल्हासह अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड श्रीगोंदा तालुक्यात खून आणि दरोड्याचा गुन्ह्यात फरार असणाऱ्या कुख्यात सुपारी किलर असलेल्या भरत विठ्ठल एडके याला पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

भरत विठ्ठल एडके हा सुपारी किलर असून त्याने शिवसेनेचे मुखेड तालुका प्रमुख शंकर ठाणेकर यांची हत्या जामखेड बीड सरहद्दीवर केली होती तसेच पुणे येथील फैजल खान या बिल्डरला सुपारी घेऊन मारले होते.तर बेलवंडी येथील आकाश मापारी हत्याकांड प्रकरणात त्याचा सहभाग होता.

मीरारोड, भाइंदर, पुणे व अहमदनगर येथे खुन, दरोड्यासह खुन, अपहरण, जबरी चोरी, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे असे 10 गंभीर गुन्हे नोंद आहेत मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी करून फरार होता नगरच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सह सहह्याक पोलीस निरीक्षक इन्कार मुंढे, सपोनि सुरेश इंगळे सहह्याक फौजदार राजेंद्र वाघ ,संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, भीमराज खारसे, सुरेश माळी ,रवि सोनटक्के, यांना भरत एडके हा कोथरूड येथे असल्याचे माहिती कळताच त्यांनी सापळा रचून भरत एडके यास ताब्यात घेतले.

भरत एडके याच्यावर दाखल असलेले गुन्हे
जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नंबर 𝙸 130/2014 भा.द.वि कलम 396,341,323,504,आर्म ऍक्ट 3/25 (मोक्का )

श्रीगोंदा 123/2014 भा.द.वि. क.395 सह 3,25 आर्म्स अँक्ट.

श्रीगोंदा 97/2015 भा.द.वि. क.394,302,201,109,341, 120b,34.

बेलवंडी 78/2014 भा.द.वी. क. 395,341.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version