Homeराजकारणमहाविकास आघाडीला सलग चौथा धक्का विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकित राहुल नार्वेकर विजयी

महाविकास आघाडीला सलग चौथा धक्का विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकित राहुल नार्वेकर विजयी

advertisement

मुंबई दि.३ जुलै

राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून दोन दिवस होणार आहे. या अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकित अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी उभे होते.

विरोधी पक्षाच्या मागणीनंतर विधानसभेत शीरगणती करण्यात आली यामध्ये भाजपचे राहुल नार्वेकर यांना 164 मत पडली तर महाविकास आघाडीकडून असलेल्या राजन साळवी यांना 107 इतकी मत पडली

राज्यसभा निवडणुकी पासून भाजपा महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के देत आहे राज्यसभा, विधान परिषद त्यानंतर थेट महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा धक्का दिल्यानंतर आता हा चौथा धक्का गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेले विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने राहुल नार्वेकर यांचा विजय प्राप्त करत महाविकास आघाडीला हा धक्का दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular