मुंबई दिनांक ३० नोव्हेंबर
23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले खरे मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मोठी खलबते झाली. एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार का देवेंद्र फडवणीस पुन्हा मुख्यमंत्री पदी विरारमान होणार का भाजप धक्का तंत्र देणार अशा अनेक चर्चा सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी आणि सरकार स्थापनेला मुहूर्त लागत नव्हता. अखेर आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर माहिती देऊन महाराष्ट्रामध्ये ५ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती प्रासारित केल्यामुळे आता महाराष्ट्र मध्ये सरकार स्थापनेचा मुहूर्त लागला असे म्हणता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच तारखेला मुंबईमध्ये येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.
मुहूर्त ठरला तरी अद्यापही मुख्यमंत्री कोण होईल भाजप धक्का तंत्र वापरणार का ? पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे. मात्र आता मुहूर्त ठरला मुख्यमंत्री तर होणारच पण कोण होणार हे पाच तारखेला कळणार आहे.