अहमदनगर दि.८ ऑक्टोबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या एका नगरसेवकाने सेवानिवृत्त वन अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी त्या नगरसेवक आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या साथीदारांविरुद्ध भादवि कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तक्रारीत दिलेली हाकिकत अशी की अहमदनगर शहरातील वसंत टेकडी भागात राहणाऱ्या सय्यद मतीन अ. रहीम( वय 72 वर्ष राहणार वसंत टेकडी ) यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालय मध्ये अंजुमन तरक्की उर्दु ट्रस्ट E -२४ अहमदनगर बाबत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज ) दाखल केला आहे हा अर्ज काढून घे म्हणून बुधवारी दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास पोलीस अधीक्षक चौकातील सिग्नल जवळ ज्येष्ठ नगरसेवक शेख नजीर अब्दुल रज्जाक तसेच शेख रशीद जहागीरदार,सय्यद एजाज ख्वाजा, इमरान रशीद जाहागीरदार यांनी यांना जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शकील सय्यद हे करीत आहेत.