अहमदनगर दि.२८ ऑक्टोबर
अहमदनगर मध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रिवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या बोर्डवर राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांचे फोटो लावण्यात आले होते मात्र सध्या राज्यामध्ये आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला असून सर्व नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या अहमदनगरच्या सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रम स्थळी जाऊन या कार्यक्रमाला लावण्यात आलेल्या फ्लेक्स काढून टाकण्यात आला आहे एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता सर्व शिक्षकांनी सुद्धा या आरक्षणाला पाठिंबा दिला असून त्यांनी ताबडतोब मंत्र्यांचे फोटो असलेला फ्लेक्स बोर्ड काढून टाकला आहे.
मंत्र्यांचे दौरे रद्द
अहमदनगर मध्ये आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय महामंडळ सदस्य त्रिवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या त्रैवार्षिक अधिवेशनाला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार होते तर फक्त राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा अधिकृत दौरा या कार्यक्रमासाठी देण्यात आला होता मात्र सध्या महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षण चांगलेच पेटले असल्याने अखेर या तीनही मंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आता अरक्षणा बाबत संतप्त झालेल्या आंदोलकांची चांगलीच धास्ती घेतली असून याच पार्श्वभूमीवर नगरमधील मंत्री दीपक केसरकर यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.