Homeशहरमराठा सेवा संघाची दक्षिण, उत्तर कार्यकारणी जाहीर. दक्षिण जिल्हाध्यक्षपदी इंजि. प्रवीण दहातोंडे...

मराठा सेवा संघाची दक्षिण, उत्तर कार्यकारणी जाहीर. दक्षिण जिल्हाध्यक्षपदी इंजि. प्रवीण दहातोंडे तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी इंजि. विवेक लव्हाट यांची नियुक्ती.

advertisement

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ अहिल्यानगर दक्षिण व मराठा सेवा संघ उत्तर या विभागाची जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीचा सोहळा संगमनेर येथे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, जेष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव तनपुरे, बाळासाहेब शेटे, सहाय्यक प्रदेश समन्वयक तसेच मार्गदर्शक दीपक भदाणे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र निबाळते, प्रदेश समन्वयक मनोज ढोकचौळे यांच्या मार्गादर्शनाखाली पार पडला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बाळासाहेब शेटे सहाय्यक प्रदेश समन्वयक यांनी भूषविले तसेच कार्यक्रमास मार्गदर्शन शिवश्री प्रा. अर्जुनराव तनपुरे व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांनी मार्गदर्शन केले या वेळी त्यांनी मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून संघाची विचारधारा व आगामी काळात संघाची होणारी वाटचाल या बाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. या वेळी प्रदेश कार्यकारणीवर अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे व मनोज ढोकचौळे यांच्या निवडीबाबत त्यांना उपस्तीतानी शुभेछ दिल्या. यावेळी संगमनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी संगमनेर तहसीलदार अरुण उंडे तसेच संघटनेचे विविध पादाधिकारी उपस्थितत होते. यावेळी नवनियुक्त उत्तर विभागासाठी विवेक लव्हाट (जिल्हा अध्यक्ष) व दक्षिण विभागासाठी प्रविण दहातोंडे (जिल्हाध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर दक्षिण विभागाच्या कार्यकारणी वर विविध पदावर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तसेच या वेळी नवनियुक्त कार्यकारणी आगामी काळात अहिल्यानगर जिह्यात संघटनेची विन अधिक घट्ट करून चांगले काम सर्व समाजाला बरोबर घेवून करेल तसेच केवळ मराठा समाजाचेच नाही तर इतर सर्व समाजास सोबत घेवून काम करेल अशी ग्वाही कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी नवनियुक्त पदाधीकार्यांच्या वतीने दिली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब खर्डे यांनी केले .
या वेळी कार्यकारी अभियंता हापसे साहेब, अमोल कवडे, गणेश हासे व जलसंपदा विभाग, कृषीविभाग, महसूल सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर मान्यवर उपस्थित होते .
नव नियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे.
अहिल्यानगर दक्षिण कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- समन्वयक कर्जत– प्रल्हाद शिंदे, सहसचिव (उपक्रम)– हृषीकेश चव्हाण, समन्वयक अहिल्यानगर दक्षिण– किशोर मरकड, कार्याध्यक्ष नेवासा– अरुण घावटे, कार्याध्यक्ष महानगर– श्रीकांत निंबाळकर, कार्याध्यक्ष ग्रामीण– बापूसाहेब वराळे, उपाध्यक्ष (जनरल)– संकेत कराळे, उपाध्यक्ष महिला– श्रीमती धनश्री शिंदे, श्रीमती स्वाती साठे, सचिव– अजिक्य थोरात, खजिनदार– नितीन ढोले, सहखजिनदार– गिरीश मरकड, पालक सदस्य– सुधीर शिंदे, कार्यालयीन सचिव– संतोष शिंदे, संघटक शहर– मुक्ताजी शेळके, प्रशांत काकडे,
वक्ता जनरल – संभाजी निमसे,
वक्ता शहर – महेश बंनकर,
वक्ता ग्रामीण – संतोष निमसे,
समन्वयक – परिमल ह्याळीज,
प्रचार प्रमुख ग्रामीण – दिनेश शेळके, विभागीय सदस्य– गणेश कवडे, सदस्य– अभिजित पानसंबळ, स्वप्नील तनपुरे.
अहिल्यानगर उत्तर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष– विवेक लव्हाट, प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित– संदीप पंडागळे, राजेंद्र बोरकर,
जिल्हा सहअध्यक्ष समन्वयक– प्रमोद माने, ग्रामीण कार्याध्यक्ष समन्वयक– प्रशांत वाकचौरे,
ज्येष्ठ समन्वयक– काशिनाथ गुंजाळ, उपक्रम कार्याध्यक्ष– संदीप नवले, विकास डुंबरे,
सरचिटणीस– महेश गायकवाड,
उपाध्यक्ष उपक्रम– बापूसाहेब वराळे, प्रमुख संघटक– संदीप देशमुख, कुशल संघटक– अभिजीत देशमुख, उपाध्यक्ष महिला– वैशाली गायकवाड,
उपाध्यक्ष प्रशासन– अनिरुद्ध धुमाळ, उपाध्यक्ष समन्वयक– रजनीकांत कवडे, संदीप कोल्हे,
उपाध्यक्ष– प्रवीण सिनारे, अभिषेक पवार, शुभम शिरसाठ,
प्रवक्ता– निखिल आदिक, राहुल गुंजाळ, खजिनदार– वैभव नवले, सहखजिनदार– बिपिन कदम, प्रसिद्धीप्रमुख– हर्षद गायकवाड, राहुल घारे,
संघचिटणीस– प्रणव वर्पे,
संघटक– निलेश आसने, अनिल थोटे, अमित चोळके कार्यकारणी जाहीर करण्यात आली व त्यांना नियुक्तीचे पत्र देखील देण्यात आले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular