अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघाच्या
दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष पदी संपूर्णा सावंत यांची निवड झाली असून त्याबाबतचे नियुक्तीपत्र मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, जेष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी बाळासाहेब शेटे, सहाय्यक प्रदेश समन्वयक तसेच मार्गदर्शक दीपक भदाणे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र निबाळते, प्रदेश समन्वयक मनोज ढोकचौळे आदी उपस्थित होते.

संपूर्णा सावंत यांनी या पूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपने सांभाळली होती.
त्याच प्रमाणे जिजाऊ ब्रिगेड प्रदेश विभागीय कार्याध्यक म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले होते त्याचीच पोहोच पावती म्हणून आता त्यांच्यावर मराठा सेवा संघाच्या दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.त्याच प्रमाणे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष , लीनेस क्लबचे माजी अध्यक्ष, पर्यावरण निवारण महामंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य, संघटक पदावर काम करण्याचा अनुभव तसेच ग्राहक संरक्षण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कामकाजाचा अनुभव पाठीशी असून त्यांच्या या निवडी बद्दल सहाय्यक प्रदेश समन्वयक बाळासाहेब शेटे प्रा. अर्जुनराव तनपुरे यांच्यासह विविध स्तरातून स्वागत होत आहे.





