अहिल्यानगरbदिनांक २४ सप्टेंबर
थोर पुरुषांच्या नावाने उभारलेल्या संकुलात मसाज पार्लरच्या नावाने अवैद्य व्यवसाय सुरू असून याला पाठबळ कोणाची असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. नगर शहरात मसाज पार्लरच्या नावाने अनेक ठिकाणी अनेक घाणेरडे प्रकार सुरू असून मसाज पार्लर आयुर्वेदिक नावाने, हॉटेल्स आणि पेठ विनाकारण बदनाम होत आहेत.

नगर शहरातील पाईपलाईन रोड झोपडी कॅन्टींग परिसर एसबीआय चौक पोस्ट ऑफिस समोर असलेल्या संकुलात मसाज पार्लरच्या नावाने काय सुरू आहे याचा शोध आता पोलिसांनी घेणे गरजेचे आहे. संपूर्ण नगर शहराला तेथे काय चालू आहे हे माहित आहे मात्र पोलिसांना याबाबत माहिती कशी नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्चभ्रू वस्तीत असलेल्या झोपडी कॅन्टीन परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेगळाच धंदा सुरू असून त्याचप्रमाणे पाईपलाईन रोड सुद्धा चांगल्या लोकोस्तीचा भाग आहे. मात्र याठिकाणी सुधा मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या अवैद्य धंद्यामुळे या भागाचे नाव खराब होत असून याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का किंवा त्यांना या गोष्टी माहीतच नसाव्यात असाही म्हणावे लागेल.
एसबीआय चौकात भिंगार छावणी मंडळाची मोठे व्यापारी संकुल असून या व्यापारी संकुलाला महापुरुषांचे नाव दिले आहेत मात्र या संकुलात अवैद्य मसाज पार्लर कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि यामुळे तिथे असलेल्या व्यापाऱ्यांनाही विनाकारण त्रास होत आहे. त्यामुळे अशा शहरातील विविध भागात सुरू असलेल्या मसाज पार्लरवर छापा टाकून सत्य काय ते समोर येणे गरजेचे आहे.





