Homeशहरमसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय..नगर शहरात उघडकीस आला प्रकार..अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची...

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय..नगर शहरात उघडकीस आला प्रकार..अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 12 डिसेंबर

नगर शहरातील नगर मनमाड रोडलगत, साई मिडास इमारत येथे अँक्यूम मसाज पार्लर / स्पा सेंटरचा मालक हा महिलांना बोलावुन मसाज सेंटरचे नावाखाली त्यांना पैशांचे आमीष दाखवुन, पुरुष ग्राहक यांना मसाज पार्लर / स्पा सेटरवर बोलावून त्यांच्याकडुन पैसे घेवुन महिलांची देहविक्री करुन, बळजबरीने अनैतिक संबध करण्यास भाग पाडुन, त्यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करुन घेतात. अशी बातमी मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून छापा टाकला असता अनिकेत बचाटे हा मसाज सेंटरचे नावाखाली महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती त्या ठिकाणी असलेल्या महिलांनी दिली.

Oplus_131072

नाशिक,कोंढवा,पुणे,हरियाना,उत्तराखंड,येथील महिला आढळून आल्या असून या सर्व महिलांची राहण्याची सद्य नगर शहरात सोय करण्यात आली होती.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अनिकेत अशोक बचाटे वय 27 वर्षे रा. जिनती, कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर ह. रा. अॅक्युम स्पा सेंटर,/ मसाज पार्लर, नगर मनमाड रोड,याच्यासह
आणखी एका ग्राहकावर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहाय्यक फौजदार शकील अहमद शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल समीर अबुतालीब सय्यद, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्चना रामभाऊ काळे, मपोहेकॉ अनिता कानिफनाथ पवार,यांच्या पथकाने केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular