अहिल्यानगर दिनांक 21 मार्च
नगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला असून सध्या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ करत होते. मात्र या प्रकरणातील आरोपी पोलिसांना अद्याप सापडला नाही त्यामुळे या प्रकरणातील पीडिता हवालदिल झाली आहे तिने आता थेट 25 मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा दिला असून आता माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरोधात अनेक महिला संघटना रस्त्यावर उतरत असून आज रणरागिणी महिला मंचच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर अभिषेक कळमकर यांच्या प्रतिमेस महिलांनी जोडे मरो आंदोलन करून निषेध व्यक्त होता

त्या नंतर आता अभिषेक कळमकर याच्या तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली असून अभिषेक कळमकर यांच्या गुन्ह्याची सूत्रे एमआयडीसी पोलिसांकडून तोफखाना आणि आता तोफखाना पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे गेले आहेत. आज बरोबर या घटनेला एक महिना पूर्ण झाला असला तरी अभिषेक कळमकर याला शोधण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. त्यामुळे आता स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास गेल्यानंतर तरी अभिषेक कळमकर सापडणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय.




