मुंबई १२ जून –
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकूण चार उमेदवार रिंगणात होते. तर भाजपचे तीन उमेदवार रिंगणात होते. सहा जागांसाठी सात उमेदवार असल्याने ही निवडणूक झाली आणि त्यात शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली. अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्याने हा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. या पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे आणि आता शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.







