अहिल्यागर दिनांक ८ एप्रिल
नोकरीचे आमिष दाखवून सर्वसाधारण घरातील महिलांवर अत्याचार करणारा अहिल्यानगर शहराचा माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याच्यावर एमआयडीसी आणि भिंगार पोलीस ठाण्यात अत्याचाराचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत तर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये एका पीडित तरुणीने अर्ज देऊन आपल्याबरोबरही विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. मात्र दीड महिना उलटून नाही माजी महापौर अभिषेक कळमकर याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही ही विशेष गोष्ट आहे.

नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी सुरुवातीला जो तपास झाला तो अहिल्यानगर पोलिसांनी केला आणि यामुळे अहिल्यानगर पोलिसांची पाठ थोपटली गेली त्याचबरोबर तीन-तीन महिलांवर अत्याचार करणारा लिंग पिसाट अभिषेक कळमकर याला पकडण्यात मात्र अहिल्यानगर पोलीस प्रशासनाला अपयश काय येत आहे ? हा एक मोठा प्रश्न पीडित महिलांना पडला आहे.
माजी महापौर अभिषेक कळमकर याच्यावर अत्याचार प्रकरणी दोन गुन्हे दाखल होऊनही पक्ष पातळीवर त्याला पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारी करून त्याला मुक्त करण्यात आले नाही किंवा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे असा संशय निर्माण होतोय की याला राजाश्रय असल्यामुळे पोलीस प्रशासन अभिषेक कळमकर याला पकडत नाहीत.
एवढी मोठी घटना घडूनही आणि गुन्हे दाखल होऊनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी गप्प का असा सवाल उपस्थित होत असून. गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेला अभिषेक कळमकर याचा अत्याचाराचा तपास सुरुवातीला तोफखाना पोलिसांकडे होता त्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आला असला तरी अद्यापही स्थानिक गुन्हे शाखेला अभिषेक कळमकर याला पकडण्यात अपयश आले आहे.
माझी महापौर अभिषेक कळमकर हा राजकीय व्यक्ती असल्यामुळे राजकारणात अनेक महिला त्याच्या संपर्कात येत होत्या मात्र सर्वसामान्य घरातील महिलांना हेरून आणि ज्या महिलांना कामाची गरज आहे असे पाहून तो अशा महिलांना नोकरीच्या आमिषाने एकांतात बोलून अत्याचार करत असल्याचं एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणि भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून लक्षात येत आहे. विशेष म्हणजे महिलांचे व्हिडिओही त्यांनी काढल्याचं दोन्ही प्रकरणाच्या तक्रारी वरून समोर आले आहे. तर पहिल्या प्रकरणात काही व्हिडिओही समाज माध्यमांवर आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आता विविध सामाजिक संस्थांकडून होत आहे.


