अहमदनगर दि. २१ सप्टेंबर
अहमदनगर शहरात सध्या गणपती उत्सवाची सुरू असून अनेक मंडळांनी थेट रस्त्यावरच आपले मंडप उभारल्याने अनेक वेळा वाहतूक कोंडी होत आहे तसेच काही ठिकाणी गणपती मंडळातील देखावे सुरू करण्याची लगबग असल्याने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले साहित्य असल्याने शहरात विविध ठिकाणी रस्ते अत्यंत अरुंद झाले आहेत. यामुळे आता आमदार संग्राम जगताप थेट यांनी रिक्षाचा आधार घेत शहरातील विविध मंडळांना भेट देऊन काही ठिकाणी देखावे उद्घाटन तर काही ठिकाणी आरतीसाठी हजेरी लावत आहेत.
वाहतूक कोंडीची समस्या असल्यामुळे आमदारांची वाट पाहत गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना थांबावे लागत असल्याने यावर उपाय शोधत आमदार संग्राम जगताप यांनी कधी दुचाकी तर कधी रिक्षाचा आधार घेत कार्यकर्त्यांसह विविध मंडळांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे.