Homeजिल्हाआमदार निलेश लंके उपोषण तिसरा दिवस आंदोलनाला हिंसक वळण...राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयातील खुर्ची...

आमदार निलेश लंके उपोषण तिसरा दिवस आंदोलनाला हिंसक वळण…राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयातील खुर्ची अज्ञात आंदोलकांनी पेटवली…

advertisement

अहमदनगर दि.९ डिसेंबर

नगर पाथर्डी तसेच नगर कोपरगाव, नगर सोलापूर या रस्त्यांच्या कामासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. मात्र प्रशासनाने अद्यापही त्यांची दखल घेतली नाही. उपोषणाला बसल्यानंतर तब्बल 12 तासांनी डॉक्टरांची एक टीम निलेश लंके यांना तपासण्यासाठी आली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले होते.

निलेश लंके यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून जवळपास तीन दिवसानंतर त्यांचे वजन एक ते दीड किलोने कमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासन दखल घेत नसल्याने आता निलेश लंके समर्थकांनी काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलनही सुरू केले आहे. तर आता या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे.

आमदार निलेश लंके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयातील खुर्ची अज्ञात आंदोलकांनी पेटवली त्यामुळे आता प्रशासनाने आंदोलनाबाबत ठोस भूमिका घ्यावी अन्यथा हे आंदोलन पुढे दिशा बदलू शकते प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करते का असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे राष्ट्रवादीचे आमदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असताना जिल्हाधिकारी मुख्यालय सोडून दुसऱ्या गावात जाऊन मीटिंग घेतात याबद्दल उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कोणताही मोठा अधिकारी न पाठवता दुय्यम अधिकारी चर्चेसाठी पाठवण्यात येत असल्यामुळे कार्यकर्त्यांचा संयम आता सुटत चालला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular