अहमदनगर दि.१० डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांच्या दुरावस्थेमुळे अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. अखेर या प्रश्नासाठी गेल्या चार दिवसांपासून पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आमरण उपोषणासाठी बसले होते.
आज शनिवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निलेश लंके यांची उपोषण स्थळी चर्चा केली तसेच यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले तसेच नॅशनल हायवे अथोरिटी चे चीफ इंजिनिअर शेलार
अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांच्या समवेत चर्चा केली.
यावेळी अजित पवार यांनी बांधकाम खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली आणि सर्व माहिती दिली नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना खात्री दिली की निलेश लंके यांनी सुचवलेली सर्व कामे मार्गी लावू नितीन गडकरी यांनी शब्द दिल्यानंतर ते शब्द पूर्णत्वाला नेतील असा विश्वास असल्याने आणि नितीन गडकरी यांनी आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क साधून सर्व रस्त्यांचे कामे मार्गी लागतील असे आश्वासन दिले आणि अखेर अजित पवार यांचे हस्ते निलेश लंके यांनी उपोषण सोडले