अहिल्यानगर दिनांक 11 जानेवारी
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगात आली असून, प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. या प्रभागातून मनसे कडून निवडणूक लढवत असलेल्या सुमित संतोष वर्मा या सुशिक्षित तरुण उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, या उमेदवाराचे उच्चशिक्षण आणि कामाची तळमळ पाहून परिसरातील तरुण-तरुणींनी यंदा परिवर्तनासाठी त्यांनाच मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शिक्षणामुळे समस्यांची योग्य जाण :
प्रभाग 11 मधील विविध भागात सध्या प्रचार रॅली आणि कोपरा सभांचे आयोजन केले जात आहे. या दरम्यान स्थानिक तरुण मतदारांशी संवाद साधला असता त्यांनी आपला कल स्पष्ट केला आहे यावेळी बोलताना तरुणांनी सांगितले की, “आजवर अनेक प्रस्थापित नेत्यांना पाहिले, पण प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न जैसे थे आहेत. सुमित वर्मा यांच्या सारखा शिक्षित नेतृत्व असल्यामुळे त्यांना तांत्रिक आणि प्रशासकीय प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्या आमच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवू शकतात.
” तरुणाईचा सुमित वर्मा यांनाच पाठिंबा”
सुमित वर्मा यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या असून, त्यांनी मांडलेले विकासाचे ‘व्हिजन’ युवकांना भावत आहे. “आम्हाला असा लोकप्रतिनिधी हवा आहे जो फक्त निवडणुकीपुरता दिसणार नाही, तर शिक्षित असल्याने ज्याचा दृष्टिकोन आधुनिक असेल,” अशी भावना एका महाविद्यालयीन तरुणीने व्यक्त केली.
नवे नेतृत्व, नवी उमेद :
मनसे उमेदवार सुमित संतोष वर्मा यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सुशिक्षित तरुण राजकारणात आले तर प्रभागाचा चेहरामोहरा बदलू शकतो, या विश्वासाने प्रभाग 11 मधील मतदार यंदा बदलाच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या प्रभागाची निवडणूक आता अहिल्यानगर शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.





