Homeविशेषनिवडणूक संपली...आता निवडणुकीमधील घडलेल्या आतील गोष्टी येऊ लागल्या बाहेर... मनसेचे पदाधिकारी सुमित...

निवडणूक संपली…आता निवडणुकीमधील घडलेल्या आतील गोष्टी येऊ लागल्या बाहेर… मनसेचे पदाधिकारी सुमित संतोष वर्मा यांची खरमरीत पोस्ट चर्चेचा विषय..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 21 जानेवारी

अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उबाठा यांना मोठा फटका बसला आहे.

Oplus_131072

निवडणुकीपूर्वी मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसे पक्ष सामील झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील महानगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित लढणार असे ठरले होते. त्यानंतर अहिल्यानगर शहरात दिल्लीगेट येथे तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत फटाके फोडून आनंदउत्सव साजरा करत या निवडणुकीत हे तीनही पक्ष किंग मेकर ठरतील असे सांगितले होते.मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत जागा वाटपाचा सुरू असलेला घोळ आणि ऐन वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना वेगळ लढण्याचा सांगितल्यामुळे मनसे हा शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यांच्यापासून वेगळा झाला आणि केवळ आठ जागांवर त्यांना अचानकपणे लढायला सांगितले. जागा वाटपाचा घोळ याचा मनसेला सर्वात मोठा फटका समजला जातो. आणि आता निवडणुकीनंतर या सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संतोष वर्मा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या परिस्थितीवर लक्ष वेधले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर चांगले ताशेरे बोलले आहेत.

सुमित वर्मा यांची पोस्ट जशीच्या तशी

स्वकर्तुत्व असताना इतरांवर अवलंबून रहायचं नाही हे या निवडणुकीत शिकायला मिळालं…. अहिल्यानगर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्वतः नागडं राहिलं आणि ठरलेल्या युती पलिकडे जाऊन निर्णय घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कपडे फाडून भरघोस नुकसान केलं त्यात हा पक्ष ठाकरेंचा आणि पक्षाचे निर्णय घेणार पारनेर लंके, हा प्रकार काही लक्षात आला नाही. लंगड्या लोकांसोबत जाण्याचा विचार केला ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्वात मोठी चुक.. हातात ३२ उमेदवार असताना ८ उमेदवार उभे करावे लागले ही पक्षावर नामुष्की ओढवली… त्याला जबाबदार या फुटकळ लोकांवर विश्वास ठेवला म्हणून नामुष्की… मुंबईत जर ठरलं आहे युती करायची तर नगरचे उपरे एवढे शहाणे कसे समजता स्वतः ला ? आणि यांच्यावर मुंबईतील कुणा शिवसेना नेत्याचं नियंत्रण आहे की नाही? फटाके मुंबई च्या युती साठी एकत्र वाजले आणि निवडणूकीत यांच्या मुळेच अहिल्यानगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मोठं नुकसान झालं… जनाधार नसलेलं नेतृत्व या शिवसेनेचे कर्ता धर्ता आहे ही गोष्ट आता उघडपणे दिसत आहे…ज्या स्व. अनिलभैय्या राठोडांच्या नावावर निवडणूक लढवली त्यांच्या मुलाला सुद्धा ही मंडळी न्याय देऊ शकली नाही तर नगर शहराला काय न्याय देणार… आम्ही पुन्हा भरारी घेऊ आमचा पक्ष रस्त्यावरचा पक्ष आहे या निवडणूका आणि पराभव मुळे काही फरक पडत नाही, शुन्यातून निर्मीती करण्याची ताकद माननीय राजसाहेब ठाकरेंकडे आहे हे कुणी विसरून चालणार नाही….

सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिल्यानगर

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular