Homeक्राईमकुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून वेश्याव्यवसाय करिता विक्री...

कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून वेश्याव्यवसाय करिता विक्री करणे भोवले

advertisement

  अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर :-

श्रीरामपूर शहरातील कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का लावण्यात आला असून मुल्ला कटरसह  चेंडवाल,पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे शेवगाव येथील वेश्याव्यवसाय चालवणारी एक महिला आणि सचिन मधुकर पगारे यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र. नं.666/2022 भादवि कलम 363 (अ), 368, 370 (4), 370(अ), पोक्सो,3,4,5,(G),6,17 पिटा ॲक्ट 4,5,6,7, अ.जा.ज.अ. प्र.का.क 3(1),(w)(i),(ii),3(2),(v),(3)(2)(5a) प्रमाणे दाखल गुन्ह्यास मुल्ला कटर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

       टोळीचा टोळीप्रमुख इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर वय 35 रा.वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर हा श्रीरामपूर मधील कुविख्यात गुन्हेगार असून त्याच्या साथीदारांनी एकत्रितपणे विविध गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे मुलाखत हा कोणताही कामधंदा न करता आपल्या गुंडांच्या जोरावर गुंडागरी करून सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन त्याच्या बळावर स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होता श्रीरामपूर मध्ये मुल्ला कटर चांगलीच दहशत होती

श्रीरामपूर येथील एका तरुणीवर मुल्ला कटर टोळीने सामूहिक अत्याचार करून त्या तरुणीला त्यांचाच टोळीचा सदस्य असलेल बाबा चेंडवाल यास विक्री केली होते बाबा चेंडवाल याने त्या तरुणीवर बळजबरी करून अत्याचार केले होते आणि तिला व्यवसाय करण्यास भाग पाडले होते.

कालांतराने त्या तरुणीची बाबा चेंडवाल,पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे यांनी शेवगाव येथे मिना  मुसवत हिच्या कुंटणखाण्यात विक्री केली विक्री करण्यासाठी सुमन मधुकर पगारे व सचिन मधुकर पगारे यांनी मदत केली होती तसेच विक्री झाल्यानंतर तिने वेश्याव्यवसाय करून मिळणाऱ्या पैशावर टोळीतील सदस्यांनी उदरनिर्वाह केल्याचे निष्पन्न झाले होते.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता ज्या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  संदीप मिटके यांनी  करून या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम  1999 चे कलम 3(1),(ii),3(2),3(4)प्रमाणे वाढीव कलम लावण्यास मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , पोलीस अधीक्षक अहमदनगर याच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र यांना पाठवला होता.त्या प्रस्तवास त्यांनी मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यास मोक्का कायद्यान्वये कलमवाढ करून कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील,पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली  डीवायएसपी संदीप मिटके ,पोलीस निरीक्षक गवळी, सहह्याक पोलीस निरीक्षक बोरसे, पीएसआय सुरवडे, महिला पोलीस नाईक अश्विनी पवार,पोलीस नाईक संतोष दरेकर,पोलीस कॉन्स्टेबल,रवींद्र माळी,विलास उकिरडे  यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular