Homeक्राईमखासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले तर अवैद्य...

खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले तर अवैद्य धंदे करणाऱ्या सरसकट सर्वांवर कारवाई करावी अन्यथा चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखे होईल…

advertisement

अहमदनगर दि.२५ जुलै
खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर चार दिवस जिल्ह्यातील सुरू असलेले अवैध धंदे आणि त्यातून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत पोलखोल केली होती. त्यानंतर आता नगर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होणार का ? पोलीस याबाबत काय भूमिका घेणार हे येत्या काळात कळणारच आहे. मात्र पोलीस प्रशासनाला सुरुवात करावी लागेल ते बड्या धेंडांचे अवैध धंदे बंद करूनच. छोट्या-मोठ्या लोकांवर कारवाई करत एखाद्या गरीबांच्या पोटावर लाथ मारून उपयोग नाही. अवैध धंद्यातून भरगच्च पैसे कमावणारे व्हाईट कॉलर मध्ये वावरणाऱ्या लोकांच्या अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

खासदार निर्देश लंके यांनी यादी जाहीर करत चंंदन तस्करी, रेशनींग, हिरा गुटखा,विमल गुटखा,आरएमडी गुटखा,नगर शहर कॅफे,वाळूट्रॅक्टर,जेसीबी,पोकलेन,आयपीएल सट्टा
वेश्या व्यवसाय हॉटेल,इतर अवैध व्यवसाय,मटका
बिंगो,मावा,दारू हॉटेल,डिझेल, पेट्रोल तस्करी,ट्रक रिक्षा,जुगार अशा अवैध धंदा चालवणाऱ्यांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे जाहीर केले आहे.

अवैद्य धंदे बंद करण्याची पहिली कुऱ्हाड पडते ती छोट्या मोठ्या टपरीवाल्या आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या धंद्यांवर.मोठे अवैध धंदेवाले पैसे कमावून गब्बर होतात मात्र छोट्या लोकांवर उपासमारीची वेळ येते आणि त्यांच्यावरच नेहमी कारवाई होते. उद्यापासून जर सर्वच गोष्टी बंद करायच्या ठरल्या तर सर्वात पहिले रात्री 12 नंतर पहाटेपर्यंत उघडे असणारे बार आणि हॉटेल्स बंद करा. नाहीतर कापड बाजारात आणि इतर ठिकाणी लागणाऱ्या पावभाजीच्या गाड्या दुधाच्या गाड्या आईस्क्रीमच्या गाड्या बंद करू नका कारण त्या ठिकाणी दारू नाहीतर चांगले पदार्थच विकले जातात मात्र दारू विकणाऱ्या हॉटेल्सला पहाटेपर्यंत परवानगी आणि दूध विकणाऱ्याला अकरा पर्यंत परवानगी हा अन्याय करू नका.

त्याचबरोबर मावा गुटखा आणि अवैद्य दारू विक्रीवरही बंदी व्हायलाच पाहिजे मात्र ही बंदी होत असताना चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचे काम पोलीस प्रशासनाने करू नये. गुटखा बनवणारे मोठमोठे कारखाने आहेत ते उध्वस्त केल्या तर छोट्या टपरी पर्यंत गुटखा पोहोचू शकत नाही मात्र छोट्या टपरीवर कारवाई करून मोठ्या गुटखा बनवणाऱ्या कारखानदारांना अभय देऊ नका हीच अपेक्षा. छोट्या मोठ्या टपरीवर दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून मोठमोठ्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विकणाऱ्यांना अभय देऊ नका अन्यथा हा प्रकार चोर सोडून संन्यासाला फाशी असाच होईल..

पोलीस प्रशासनाने कारवाई करताना कोणत्याही भेदभाव न करता सरसकट सर्वांवर कारवाई करावी शहरामध्ये अनेक अवैद्यपणे लॉज चालू आहेत अनेक लॉजला कोणतीही परवानगी नसताना ही लॉज चालू असून या ठिकाणी काय चालू असते हे सर्वश्रुत आहे. मात्र एकीकडे नगर हे खेडे आहे असे म्हणताना मग या खेड्यात लॉजवर राहण्यासाठी कोण येतं हा मोठा प्रश्न आहे आणि हे लॉज रात्रंदिवस फुल कसे असतात हा दुसरा मोठा प्रश्न आहे. या लॉजवर काय धंदे चालतात हे पाहून त्यावर पोलिसांनी कारवाई करावी.

नगर शहरात हुक्का पार्लरवर अनेक वेळा छापे पडले आहेत.मात्र हे छापे छोट्या-मोठ्या हुक्का पार्लर वर पडले आहेत अनेक मोठ्या हॉटेलमध्येही हुक्का पार्लर चालू आहेत या ठिकाणी अद्यापही कधी छापा पडल्याचे ऐकवात नाही. अनेक नामांकित हॉटेल्स मध्ये हुक्का पार्लर चालतो या ठिकाणी पोलीस जाण्यासाठी का घाबरतात. छोट्या हुक्का पार्लर वर छापा टाकून कारवाई होते मग मोठ्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लर कोणाच्या आशीर्वादाने चालते हेही समोर यायला हवे कारवाई करायची तर सरसकट सर्व हुक्का पार्लरवर होणे गरजेचे आहे.

नगर शहरात कॅफेच्या नावाखाली काय सुरू आहे हे सर्वश्रुत आहे. या कॅफेमध्ये अनेक अवैध धंदे चालतात खासदार निलेश लंके यांनी जी यादी वाचून दाखवली त्यामध्ये कॅफेचेही नाव आहे. अशा कॅफे चालकांना कोणाचे अभय आहे हेही समोर येणे गरजेचे आहे. आणि ठराविक कॅफेंवर कारवाई न करता सरसकट सर्वच अवैद्य कॅफेवर कारवाई व्हावी अन्यथा या ठिकाणीही अन्याय होऊ शकतो.

नगर शहरात अनेक रीक्षांवर नंबरही नसतो अशा अनेक रिक्षा रस्त्यावर धावताना दिसतात त्यांच्यावरही कारवाई करून त्या रिक्षा कायमच्या जप्त करणे आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेने करणे गरजेचे आहे.

चार दिवसांच्या उपोषणानंतर खा .निलेश लंके यांनी जाहीर केलेली यादी आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले तर अवैद्य धंदे करणारे आणि कायदा मोडणाऱ्या सरसकट सर्वांवर कारवाई करावी अशीच नगरकरांची इच्छा आहे. मात्र चोर सोडून संन्यासाला फाशी दिली तर मग खासदार निलेश लंके यांनी केलेल्या उपोषणाचा उपयोग होणार नाही. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने ऍक्शन मोडमध्ये येण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण गोरगरीब जनतेला त्रास न देता व्हाईट कॉलरच्या आड अवैध धंदे करणाऱ्यांची कॉलर पकडून त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular