Homeराजकारणखासदार संजय राऊतांच्या घरी ईडी दोन तासापासून चौकशी सुरू

खासदार संजय राऊतांच्या घरी ईडी दोन तासापासून चौकशी सुरू

advertisement

मुंबई दि.३१ जुलै

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

 

ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.

आता संजय राऊत यांनी या चौकशी दरम्यान ही तीन ट्वीट केले असून “तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील ,खोटी कारवाई खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही,मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र” असा ट्विट संजय राऊत यांनी केल आहे सुमारे दोन तासापासून संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समजते

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular