Homeविशेषखैराचा खुटा - नगरकरांचा स्वप्नातला उड्डाणपूल झाला मात्र नगरकरांच्या रोजच्या जीवनातील रस्त्यांचं...

खैराचा खुटा – नगरकरांचा स्वप्नातला उड्डाणपूल झाला मात्र नगरकरांच्या रोजच्या जीवनातील रस्त्यांचं काय?खासदार साहेब शहरातील रस्त्यांकडे लक्ष द्या ज्याप्रमाणे आज उड्डाणपुलाचा भव्य सोहळा होतोय त्याचप्रमाणे शहरातील रस्ते चाकाचक झाल्यावर तुमचाही सत्कार सोहळा नगरकर असाच भव्यदिव्य करतील पाणीपट्टी माफ करताना ज्या नगरसेवकांनी त्यांना साथ दिली त्या नगरसेवकांनी खासदारांकडून निधी घेऊन शहरातील रस्ते चाकाचक करावे करण लोकसभेला शहरातून जास्त मते भाजपलाच मिळाली होती.

advertisement

अहमदनगर दि.१९ नोव्हेंबर

अहमदनगर शहरामध्ये पूर्ण झालेला उड्डाणपूल सध्या चांगलाच चर्चेचा विषय आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी सध्या उड्डाणपूलाचे कौतुक होताना दिसते.मात्र हा उड्डाणपूल झाल्यानंतर नगरकरांच्या समस्या सुटणार का? तर याचे उत्तर नाही या शब्दात येते. कारण हा उड्डाणपूल अहमदनगर शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी प्रामुख्याने उपयोग होणार आहे. पुणे,औरंगाबाद, सोलापूर आणि जामखेड या प्रवाशांसाठी या उड्डाणपुलाचा उपयोग होणार आहे.कारण बहुतांशी नगरकरांचा प्रवास हा शहरातील अंतर्गत रस्त्यावरूनच होत असतो आणि हा उड्डाणपूल नगर औरंगाबाद नगर सोलापूर महामार्गावर असल्याने याचा काहीसा उपयोग नगरकरांना होणार नाही. मात्र तरीही नगर शहरात उड्डाणपूल होतोय म्हणून प्रत्येक नागरकरांना याचं कौतुक आहेच आणि असालाही पाहिजेच.

मात्र हे होत असताना नगर शहरातील रस्त्यांचं काय हा प्रश्न समोर येतोय. अहमदनगर शहरातील अंतर्गत रस्ते सध्या शिल्लकच राहिलेले नाहीत फेज टू ,भुयारी गटार योजना गॅसची पाईपलाईन तसेच विविध कंपन्यांच्या इंटरनेटच्या वायरीसाठी खणलेल्या खड्ड्यांमुळे शहर खड्डेमय झाले आहे. त्यामध्ये यावर्षी पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे उरलेसुरले सर्वच रस्ते वाहून गेले आहेत. तर ज्या रस्त्यांची कामे झाले आहेत त्या रस्त्यांची अवस्था पुन्हा खराब झाली आहे. याचे एक उदाहरण म्हणजे तारकपूर ते गंगा उद्यान रोड असू शकतो तसेच जुन्या ग्राहक भंडार पासून ते तेलीखुंट चौकापर्यंतचा रस्ता सहा महिन्यांपूर्वी केलेला असताना आता अस्तित्वात आहे का हे तिथे गेल्यावर समजू शकते. असे अनेक रस्ते रात्रीतुन तयार झाले आणि पावसामुळे वाहून गेले असे प्रकार शहरात झालेले आहेत.

त्यामुळे उड्डाणपुलाचा कौतुक होत असताना शहरातील रस्त्यांचं काय यासाठी आता लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे महानगरपालिकेत उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे मात्र शिवसेनेतील एक गट सातत्याने शहरातील आमदारांवर खड्ड्यांसाठी टीका करताना दिसतो तर काँग्रेस मधील एक गट खड्ड्यांबाबत आक्रमक झालेला आहे.मात्र नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बरोबर असल्याचे चित्र पाहायला मिळते भाजपचे नेते कधीमधी सोशल मीडियावर खड्ड्यांबाबत आवाज उठवतात मात्र शहराची परिस्थिती आहे तशीच आहे. शहरातील नागरिकांचे हाडे खिळखिळे झाले आहेत. धुळीमुळे श्वासनाचा त्रास होतोय. महानगरपालिका प्रशासनाला याचं काहीच घेणं देणं नसल्यासारखं प्रशासन वागत आहे. त्यामुळे आता उड्डाणपुलाचा जेवढा कौतुक सोहळा खासदारांनी केला तेवढाच कौतुक सोहळा नगर शहरातील रस्त्यांचा होणे गरजेचा आहे. शहरातील रस्ते जोपर्यंत चकाचक होत नाही तोपर्यंत नागरिकांनी खासदारांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे हे काम खासदारांचे नसते असे काही जण म्हणू शकतात मात्र ते करू शकतात अशी नगरकरांचे खात्री असल्यामुळे नगरकरांनी त्यांचा पाठपुरावा करावा अशी वेळ आली आहे.ज्याप्रमाणे उड्डाणपुलाचा शुभारंभ प्रसंगी लेझर शो आतिषबाजी असा मोठा शो होणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील संपूर्ण रस्ते झाल्यानंतर खासदारांचे कौतुकही असाच प्रकारे मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यामुळे खासदारांनी उड्डाणपूला नंतर आता शहरातील रस्त्याकडे लक्ष द्यावे कारण लोकसभेला अहमदनगर शहरातून खासदार सुजय विखे पाटील यांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे किमान त्यासाठी का होईना खासदारांनी नगर शहरातील रस्त्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

खासदारांच्या प्रयत्नामुळे आणि महानगरपालिकेच्या काही नगरसेवकांमुळे विळद घाट येथील विविध कॉलेज आणि संस्थांना 27 नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. त्याची पाणी पट्टीची थकबाकी सहा कोटी रुपये असताना ती कमी करून दोन अडीच कोटी रुपयांवर आणली गेली आहे. त्यामुळे तीन साडेतीन कोटी रुपयांचा फटका महानगरपालिकेला बसत असतानाही नगरसेवकांनी याला विरोध न करता पाणीपट्टी कमी करण्याचा ठराव केला. त्याप्रमाणे आता सर्वच पक्षातील नगरसेवकांनी खासदारांकडे पाठपुरावा करून शहरातील रस्त्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून घ्यावा आणि शहरातील रस्ते चकाचक करून संपूर्ण नगर शहराच्या वतीने मोठा सत्कार सोहळा करावा की जेणेकरून उड्डाणपुलाप्रमाणेच नगर शहर चकचकीत होईल.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular