Homeराजकारणखासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

advertisement

मुंबई दि.१ ऑगस्ट- खासदार संजय राऊत यांना चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. संजय राऊत 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात अली आहे.

आज संजय राऊतांना सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर अशोक मुंदरगी संजय राऊतांसाठी युक्तिवाद केला, तर ईडीच्यावतीनं हितेन वेणेगावकर करणार युक्तिवाद केला
संजय राऊतांना सत्र न्यायालयात हजर केलं, कोर्ट रूम नंबर 16 मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीनं रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केलं, ईडीकडून संजय राऊत यांची आठ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती.


संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रवीण राऊत याला अटक करुन अनेक महिने झाले. इतके दिवस कारवाई का केली नाही. कारण ही कारवाई राजकीय हेतूने करायची होती.असा युक्तिवाद संजय राऊत यांच्या वकिलांनी केला

मुंबई पोलिसांच्या EOW शाखेने 2020 मध्ये गुन्हा दाखल करुन पत्रा चाळ प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यानंतर ED ने ECIR दाखल केला आणि प्रवीण राऊत यांना अटक केली. राऊत यांना आजवर अटक झाली नाही याचा अर्थ हे संपूर्णत: राजकारण आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. प्रवीण राऊत हे व्यापारी आहेत आणि संजय राऊत गरीब नाहीत, याचा त्यांची स्वत:ची कंपनी आहे, ज्यातून त्यांना नफा मिळतो. जर कोठडी द्यायची असेल तर ती फार कमी कालावधीसाठी द्यावी. अशी मागणी संजय राऊत यांच्या वकील यांनी न्यायालयासमोर केली होती अखेर दोन्ही बाजूंचा व्यक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular